लोकनेते स्व. सूर्यकांतदादा यांना ८२ व्या जयंतीनिमित्त श्रीराजभैया माने पाटील यांच्याकडून अभिवादन.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते स्व. सूर्यकांतदादा माने देशमुख यांची जयंती साजरी

वेळापूर ( बारामती झटका )

वेळापूर ता. माळशिरस गावचे थोर सुपुत्र सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन लोकनेते स्व. सूर्यकांतदादा माने देशमुख यांची ८२ व्या जयंतीनिमित्त वेळापूर येथील सेवा सोसायटीच्या कार्यालयात संग्रामनगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवा नेते श्रीराजभैया माने पाटील यांनी सूर्यकांतदादांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, सोसायटीचे संचालक श्रीधर देशपांडे, युवा उद्योजक उमेशशेठ भाकरे व श्रीराजभैय्या यांचे मित्र मंडळ उपस्थित होते.

वेळापूर पंचक्रोशीमध्ये सूर्यकांतदादांनी विकासाची गंगा आणलेली होती. परिसरामध्ये रस्ते, विज, पाणी या सर्व मूलभूत गरजा पूर्ण केलेल्या आहेत. वेळापूर गावचा सर्वांगीण विकास हाच ध्यास, असे सूर्यकांतदादांचे विकासाचे स्वप्न होते. त्यांनी अनेक स्वप्न पूर्ण केलेली आहेत. सूर्यकांतदादा यांच्याविषयी समाजामध्ये आत्मीयता व प्रेमभावना आहे. वेळापूर पंचक्रोशीसह आसपासच्या गावामध्ये सूर्यकांतदादांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अनेक लोक आवर्जून उपस्थित राहत असतात.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाची बैठक माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न…
Next articleनातेपुते येथील ऐतिहासिक राजकीय वारसा असणारे देशमुख घराण्यातील मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख नातेपुते नगरीचे पहिले उपनगराध्यक्ष बनले – सत्तारभाई नदाफ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here