आमदार राम सातपुते यांचे प्रयत्न के. के. पाटील , संजय देशमुख यांच्या सहकार्याने होलार समाज व मायाक्का देवी भक्तांचा प्रश्न मिटला. लक्ष्मण बंडू पारसे.
राम सातपुते यांनी आमदार नसताना होलार समाजाचा शब्द आमदार झाल्या नंतर पाळला होलार समाजात आनंदाचे वातावरण.
कोळेगाव ( बारामती झटका )
कोळेगाव तालुका माळशिरस येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2021- 22 काय काय जावा या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातील मंजूर कामांमध्ये कोरेगाव येथील रंगनाथ परसे वस्ती येथे मायाका देवी मंदिरासमोर सभा मंडपासाठी सात लाख रुपये मंजूर झाले असल्याचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा चे माळशिरस तालुका सरचिटणीस नारायण मारूती पारसे यांनी सांगितले.
लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य ज्येष्ठ नेते के के पाटील व भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या सहकार्याने होलार समाज व मायाक्का देवी भक्तांचा प्रश्न मिटलेला आहे असे लक्ष्मण बंडू पारसे यांनी सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कोळेगाव येथील सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ पारसेनगर येथील गणपती आरती साठी राम सातपुते यांना बोलावण्यात आलेले होते. गणपतीची आरती नंतर औपचारिक चर्चा करताना राम सातपुते यांनी होलार समाजाच्या अडचणी विषयी चर्चा केली अनेक लोकांनी वेगवेगळ्या अडचणी सांगितलेल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने होलार समाजास सभामंडप नाही आणि मायाका चिंचणीचे मायाक्का देवी मंदिर आहे देवीच्या समोर सभामंडप झाल्यानंतर देवींच्या भक्तांचा आणि होलार समाजाचा प्रश्न सुटणार आहे असे सांगितल्यानंतर राम सातपुते यांनी भविष्यामध्ये निश्चितपणे आपल्या होलार समाज व मायाक्का देवी साठी सभामंडप देण्याचे आश्वासन दिले होते माळशिरस तालुक्यातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने राम सातपुते यांना माळशिरस तालुक्यातील जनतेने आमदार केलेले आहे आमदार झाल्यानंतर राम सातपुते यांनी गणपती आरती च्या वेळेला दिलेला शब्द पाळलेला असल्याने होलार समाज व मायाक्का देवी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कोळेगाव येथील जनतेला अडचणीच्या काळात राम सातपुते यांनी आधार दिलेला आहे अचानक अवकाळी पावसाने गावामध्ये ओढ्याला पाणी आल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले होते अशा अडचणीच्या वेळी आमदार राम सातपुते मित्र मंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आलेले होते कोरोनाच्या महामारीत सुद्धा आमदार राम सातपुते मित्र मंडळाच्या वतीने मदत करण्यात आलेली होती. होलार समाजाचा अनेक दिवसाचा प्रश्न ठेवलेला असल्याने समाजामधून आमदार राम सातपुते यांच्याविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng