नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते पंचक्रोशीतील भाजपाचे जेष्ठ नेते नातेपुतेचे माजी सरपंच व विद्यमान नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत यांचे बंधु दाजीराम राऊत यांचे अल्पशा आजाराने निधन झालेले होते. शुक्रवार दि. 20/05/2022 रोजी सकाळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी राऊत परिवाराचे सांत्वन केले.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष देविदास चांगण, नगरसेवक अमित चांगण, भाजपा कार्यकर्ते शशी कल्याणी आदींसह राऊत परिवार यांचे नातेवाईक उपस्थित होते. स्वर्गीय दाजीराम राऊत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
