लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे कडून खंडकरी शेतकऱ्यांचे नेते स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या परिवारांची सांत्वन.

मांडवे ( बारामती झटका )


माळशिरस तालुक्यातील मांडवे गावचे ज्येष्ठ नेते खंडकरी शेतकऱ्यांचे आधारस्तंभ दादा माधवराव पालवे पाटील उर्फ दादा पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते त्यांच्या मांडवे येथील मातोश्री निवास या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमदार राम सातपुते यांनी परिवारांची सांत्वनपर भेट घेतली.
माळशिरस तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये खंडकरी शेतकऱ्यांचे नेते दादा पाटील यांनी भरीव काम केलेले होते त्यांच्या दुःखद निधनाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे अशा शेतकरी नेत्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राम सातपुते यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.


स्व.दादा पाटील यांचे चिरंजीव दामोदर पालवे पाटील सध्या माळशिरस तालुका भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या परिवारांची भेट लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी घेतली त्यावेळेस भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वावरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस युवा नेते संजयजी देशमुख, विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसदाशिवनगर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची मोळी गाळपासाठी जाणार का? वादाच्या भोवऱ्यात अडकणार ?
Next articleप्रताप क्रीडा मंडळाचा दिपवाळी निमित्त सर्वसामान्य जनतेसाठी स्तुत्य उपक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here