लोकप्रिय आ. राम सातपुते यांच्यावतीने कारुंडे विकास सेवा सोसायटीचे बिनविरोध नूतन चेअरमन सूर्यकांत पाटील यांचा सन्मान

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यावतीने कारुंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे बिनविरोध नूतन चेअरमन सूर्यकांत विठ्ठल पाटील उर्फ दादा यांचा सन्मान माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आला. यावेळी कारूंडे गावातील प्रतिष्ठित नागरिक व आजी माजी संचालक उपस्थित होते.

कारूंडे विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित कारुंडे या संस्थेची स्थापना दि. 05/06/1925 साली झाली आहे. संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष येत आहे. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काळजीवाहू चेअरमन शिवाजी आण्णा रुपनवर पाटील, कारुंडे गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच, माजी चेअरमन हनुमंतराव पाटील, माजी चेअरमन सुभाष पाटील, लोक नियुक्त थेट जनतेतील माजी सरपंच अमरशेठ जगताप, माजी चेअरमन भास्कर शिंदे यांच्यासह अनेक लोकांनी संस्थेची स्थापनेपासूनची बिनविरोध परंपरा कायम ठेवत पोलीस दलामध्ये काम करून सेवानिवृत्त झालेले सूर्यकांत पाटील यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा दिलेली आहे. नवनियुक्त चेअरमन यांनी गावातील जेष्ठ मंडळी व तालुक्यातील सर्व पक्षाचे मान्यवर यांच्या सहकार्याने शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेची बिनविरोध चेअरमनपदाची धुरा आलेली असल्याचे सांगितले होते. यावेळी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी नूतन चेअरमन सूर्यकांत पाटील यांचा माळशिरस तालुक्याच्यावतीने सन्मान करून भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाती परिक्षणावर आधारित पिकानुसार खत नियोजन – सतीश कचरे, मंडळ कृषि अधिकारी
Next articleसोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांची पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here