रामाच्या राज्यात रावण प्रवृत्ती, गरुड पुराणातील भाकड कथेचं कथन करण्याचे काम सुरू आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना माळशिरस विधानसभेच्या मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर राज्यात सत्ता नसताना सुद्धा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने अनेक विकास कामांना निधी मिळवून तालुक्यातील जनतेच्या जनहितार्थ योजना व अनेक रेंगाळलेली विकासकामे करून मतदार व सर्व सामान्य जनतेची मने जिंकलेली आहेत तर, सामाजिक कार्यातून अनेक गोरगरीब रुग्णांचे लाखो रुपये खर्च वाचवून मोफत ऑपरेशन व शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. लहान मुलाच्या हृदयाचे ऑपरेशन करून मतदार संघातील लहान मुलाचे हृदय सुध्दा जिंकलेले आहे. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांना सर्वसामान्य जनतेने विश्वास टाकून निवडून दिलेले असल्याने जनतेला राम राज्य आल्यासारखे वाटत आहे. अशा राम राज्यात रावण प्रवृत्ती गरुड पुराणातील भाकड कथेचे कथन करण्याचे काम सुरु असल्याची भावना गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची झालेली आहे.

माळशिरस तालुक्यतील कण्हेर येथील कुंडलिक येळे यांचा दोन वर्षाचा मुलगा रुद्र कुंडलिक येळे याच्या ह्रदयाला जन्मताच छिद्र होते. रुद्रच्या वडिलांनी आमदार राम सातपुते यांना जनता दरबारात येऊन आपली अडचण सांगितली होती. त्यावर राम सातपुते यांनी तात्काळ दखल घेत मुंबईतील नामांकित रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करून दिली. महागड्या उपचारामुळे अनेकजण वंचित राहतात, कधी कधी तो आजार बळावतो आणि जीवावर बेततो. मात्र, अशा कुणाचीही आजाराची कल्पना आल्यानंतर राम सातपुते हे तातडीने मदतीला धावून जातात. जनता दरबारात आलेल्या रुद्रच्या मदतीला धावून जात त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम आमदार राम सातपुते यांनी केले.

माळशिरसच्या कण्हेर येथील रुद्रवर मुंबईतील नामांकीत अशा कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. त्यामध्ये 10 लाख 50 हजार रुपयांची ही शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करून दिली. एक महिन्याच्या उपचार आणि देखरेखी नंतर रुद्रला गावाकडे आणले आहे. सध्या त्याच्यावर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेने येळे परिवार आनंदात आहे.

दरम्यान रुद्र रुग्णालयात असताना आमदार राम सातपुते यांनी त्याची व पालकांची भेट घेऊन आमदार आहे, अशी डोक्यातील हवा काढून परिवारातील सदस्य असावा असे कठड्यावर बसून तब्येतीची विचारपूस केली व कोणतीही मदत लागली तर कायम सोबत असल्याचा येळे कुटुंबियांना विश्वास दिला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला राम कुठे जन्मला, कुठे वाढला, यापेक्षा राम आमच्या अडचणीच्या व कठीण प्रसंगी उपयोगी आहे, हेच आम्ही कायम लक्षात ठेवणार अशी भावना मतदार संघातील जनता व्यक्त करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng