Uncategorizedक्रीडाताज्या बातम्याशैक्षणिक

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कुस्तीपटू कुमारी श्रद्धा खरात हिचा सन्मान करून विमान प्रवासाची जबाबदारी स्वीकारली.

उत्तराखंड हरिद्वार येथे स्टुडन्ट ऑलिंपिक असोसिएशन स्पर्धेमध्ये 40 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मलेशियाला खेळणार

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस येथील जनता दरबाराच्या प्रसंगी कुस्ती क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कुमारी श्रद्धा संतोष खरात माळशिरस तालुक्याच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा रोवणाऱ्या माळशिरस कन्येचा सन्मान केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजप माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, अहिल्यादेवी सोसायटीचे चेअरमन संदीप पाटील, नगरसेवक आबा धाईंजे, भांबुर्डी ग्रामपंचायतचे सदस्य रवीतात्या मोटे, श्रद्धाचे वडील संतोष खरात, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, युवा नेते विश्वजीत पाटील, भाजपा माळशिरस शहर उपाध्यक्ष राजेंद्र वळकुंदे, आमदार यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे, बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चैनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. श्रद्धाची हलाखीची परिस्थिती असल्याने लोकप्रिय दमदार आमदार यांनी श्रद्धा खरात हिच्या मलेशिया येथे स्पर्धेसाठी जाण्याच्या विमान खर्चाची जबाबदारी घेतलेली आहे. जनता दरबारातील उपस्थित जनतेने आमदार राम सातपुते यांच्या निर्णयाचे कौतुक केले. जनता दरबारामध्ये अनेक लोकांचे अडीअडचणीचे प्रश्न आमदार यांनी सोडविले आहेत. वैद्यकीय, शिक्षण, व्यक्तिगत व सार्वजनिक अडचणी सोडविल्या आहेत.

माळशिरस प्रशाला माळशिरस येथील विद्यार्थिनी कु. श्रद्धा संतोष खरात हिने उत्तराखंड हरिद्वार येथील नवव्या स्टुडन्ट ऑलिंपिक असोसिएशन नॅशनल स्पर्धेमध्ये 14 वयोगटात 40 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावलेले आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मलेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. माळशिरसच्या श्रद्धा खरात हिने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. माळशिरस तालुक्याच्या कुस्ती क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या श्रद्धा खरात हिच्या यशामध्ये माळशिरस प्रशाला माळशिरसचे प्राचार्य, शिक्षक, आई-वडील व मल्लसम्राट व्यायाम तालमीचे वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभलेले आहे.

कु. श्रद्धा संतोष खरात माळशिरस प्रशाला माळशिरस येथे आठवीमध्ये शिकत आहे. तिने कुस्ती मल्लविद्या संकुल पोलीस मुख्यालय कळंबोली येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेला होता. प्रशालेतील प्राचार्य व शिक्षक यांच्याबरोबर मल्लसम्राट व्यायाम तालमीचे वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले होते.

कु. श्रद्धा खरात हीची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. वडील संतोष खरात चार चाकी गाडी चालवून उदरनिर्वाह करीत आहेत. परिस्थिती हलाखीची व बेताची आहे. तरीसुद्धा सर्वांच्या सहकार्याने श्रद्धाला उत्तराखंड हरिद्वार येथे स्पर्धेसाठी पाठवलेले होते. कु. श्रद्धा हिने दैदिप्यमान यश मिळवून माळशिरसकरांची मान उंचावलेली आहे. गुरुजनांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे कष्ट आणि श्रद्धा हिची जिद्द, चिकाटी, मेहनत या बळावर सुवर्णपदक मिळवलेल्या श्रद्धा खरात हिला मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी लोकप्रिय दमदार आमदार यांनी विमानसेवेची जबाबदारी घेतलेली असल्याने श्रद्धाचा मलेशिया दौरा निश्चित झालेला आहे. श्रद्धाला बारामती झटका परिवाराचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort