लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची आरपीआय माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट.

वेळापूर ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद उर्फ पप्पू सरतापे यांच्या वेळापूर येथील माळशिरस तालुका संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, रिपाई युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष किरण धाईंजे, संतोष कांबळे, प्रवीण साळवे, शरद साबळे व आरपीआयचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाचे केंद्रीय राज्यमंत्री व आरपीआयचे सर्वेसर्वा रामदासजी आठवले व राज्यमंत्री दर्जाच्या महामंडळाचे माजी अध्यक्ष व आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज आहे.

सोमनाथ भोसले यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मजल मारलेली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मिलिंद उर्फ पप्पू सरतापे यांनीही माळशिरस तालुक्यात आरपीआय पक्ष वाढवण्यासाठी काम केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन रामदास आठवले आणि राजाभाऊ सरवदे यांनी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. कार्यकर्त्यांना जनसंपर्क व्हावा यासाठी वेळापूर येथे संपर्क कार्यालय सुरू केलेले आहे.

सदर संपर्क कार्यालयास माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. यामध्ये वैचारिक बैठक संपन्न झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथील आदर्श व्यक्तीमत्व सुभाषतात्या बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाज प्रबोधन उपक्रमाचे आयोजन.
Next articleग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here