लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृतीताई यांनी ऊसतोड मजुरांचे दमदार आदरातिथ्य केले.

संस्कृतीताई सातपुते यांच्या आपलेपणाच्या संस्कृतीवर ऊसतोड मजूर भारावून गेले.

मांडवे ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृतीताई यांनी ऊसतोड मजुरांचे दमदार आदरातीथ्य करून संस्कृतीताई सातपुते यांच्या आपलेपणाच्या संस्कृतीवर ऊसतोड मजूर भारावून गेलेले आहेत.

दिवाळीपूर्वी ऊसतोड मजूर, कामगार आपली घरदार सोडून बायका मुलांना घेऊन कारखान्याकडे येत असतात. ऐन दिवाळीचा सण तोंडावर असताना सुद्धा वाहन मालकाकडून मुकादमाने आणलेले पैसे ऊसतोड मजुरांना दिलेले असतात. त्याच पैशावर उदरनिर्वाह सुरू असतो. त्यामुळे ऊसतोड मजूर यांना कारखाना सुरू झाला की, आपल्या गावावरून कारखाना सुरू असणाऱ्या ठिकाणी यावे लागते.

सणांचा राजा म्हणून दीपावली सणाकडे पाहिले जाते. गरीब असो वा श्रीमंत असो, हा सण गावातील लोक साजरा करीत असतात. मात्र बाहेरून येणाऱ्या ऊसतोड मजुरांना सण करण्याची अडचण येते. कारण दैनंदिन जगणं मुश्किल असते. उचल घेतलेली भेटायची कशी असा प्रश्न समोर असतो. त्यामुळे आनंदाने दिवाळी करता येत नाही. बागायतदार, जाणारे येणारे नव्या कपड्यात फटाक्या वाजवत असतात, मात्र ऊसतोड मजुरांना लांबून अंगावरील आहे त्या कपड्यावर पाहत बसावे लागते. आमदार पत्नी संस्कृतीताई यांनी ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड व आनंदाची केलेली आहे. पुरुष मंडळींना कपडे, स्त्रियांना साड्या, लहान मुलांना ड्रेस घेऊन दीपावलीचे गोडधोड पदार्थ घेऊन त्यांच्या सोबत दीपावली साजरी केलेली आहे.

पती आमदार असताना सुद्धा संस्कृतीताई यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सर्वसामान्य ऊसतोड मजुरांमध्ये सामील होऊन ऊसतोड मजुरांची मुले प्रेमाने उचलून घेऊन आपलेपणाचे दर्शन घडलेले असल्याने ऊसतोड मजूर भारावून गेलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. धन्य ती भारतीय संस्कृती आणि धन्य त्या आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृती. संस्कृतीताई यांच्या विषयी आदरयुक्त प्रेम भावना ऊसतोड मजुरांमध्ये निर्माण झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्रीराम कृषी महाविद्यालय पानीव, अंतर्गत चौंडेश्वरवाडी येथे कृषिदूतांकडून पेरणीपूर्व बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक
Next articleगोरडवाडी येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. अनिल तुपे, महाराज नाशिक यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here