लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीमुळे राष्ट्रवादीचे छोटे-मोठे काटे भाजपच्या कमळाकडे आकर्षित…..

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सर्व समावेशक कार्याची भुरळ विरोधकांना लागते.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळातील विविध खात्याचे कॅबिनेट व राज्यमंत्री व विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्या विशेष सहकार्यातून माळशिरस विधानसभा मतदार संघात सर्व समावेशक सामाजिक व विकासात्मक कार्याची भुरळ विरोधकांना लागलेली आहे. लोकप्रिय दमदार आमदार यांच्या दमदार कामगिरीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असणारे अनेक छोटे मोठे काटे भाजपच्या कमळाकडे आकर्षित होत असल्याने भविष्यात माळशिरस विधानसभा मतदारसंघ दिवसेंदिवस भाजपची ताकद वाढत असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह लोकप्रिय आ. राम सातपुते यांच्या रूपाने फुललेले आहे. आ. राम सातपुते यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवनामध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी एकनिष्ठ व प्रामाणिकपणा यावर यशस्वीपणे पार पाडून नेत्यांचा विश्वास संपादन केला आहे. आणि याच जोरावर गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे विरोधी सरकार असतानासुद्धा मतदारसंघातील व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर भाषेवर प्रभुत्व व कार्यामध्ये आक्रमकपणा असल्याने अनेक सर्वसामान्य जनतेची कामे राजकीय कौशल्य वापरून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने केलेली होती. सध्या भाजपच्या विचाराचे सरकार अस्तित्वात आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह विविध खात्याच्या कॅबिनेट व राज्यमंत्री यांचेकडून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सुरू आहे. मतदार संघात जनता दरबार पहिल्यांदा सुरू करून सर्वसामान्य जनतेला हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व जनता यांच्यामधील दरी कमी होऊन जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहे. आ. राम सातपुते सर्वसामान्य जनतेसाठी कायम हजर असतात. सहज उपलब्ध होत असल्याने लोकांमध्ये आमदारांविषयी आत्मीयता व सहानुभूती निर्माण झालेली आहे. अनेक लोकांची व्यक्तिगत व सार्वजनिक कामे करून जनतेची मने जिंकली आहे. कितीतरी लोकांचे आजाराचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवले आहे. शाळेतील विद्यार्थी व शिकलेल्या विद्यार्थ्यांना उद्योग, व्यवसाय व नोकरी यामध्ये सहकार्य करणे, शेतकऱ्यांच्या पाण्याचा, विजेचा, औषधे, बी-बियाणे, खते यांच्यासाठी कायम प्रयत्न असतो. दिवसेंदिवस लोकप्रिय आ. राम सातपुते यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने विरोधी गटातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून विरोधासाठी विरोध नको, कार्य करणारा आमदार आहे, अशी भावना विरोधी गोठातून होताना पाहावयास मिळत आहे‌.

माळशिरस तालुक्यात भाजपचा मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक छोटे मोठे कार्यकर्ते दमदार कामगिरीमुळे सर्वसमावेशक कार्याची विरोधकांना लागली आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे छोटे-मोठे तास, मिनिट, सेकंद काटे भाजपच्या कमळाकडे आकर्षित होत असल्याने भविष्यात माळशिरस विधानसभा मतदार संघात जोमाने भाजपचे कमळ फुललेले पहावयास मिळेल, अशी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या कार्यातून वाटचाल सुरू असल्याने राजकीय विश्लेषकांमधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलक्षवेधी बातमी : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे हर्षुभाऊ भाजपमध्ये जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झाले.
Next articleफोंडशिरस शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पै. सुनील पाटील तर उपाध्यक्षपदी सौ. अनिता रणदिवे यांचे निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here