लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते रितेशदादा पालवे यांचा फलक लक्ष वेधून घेत आहे…


लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली…

मांडवे ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या ठिकाणी मांडवे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य युवा नेते रितेशदादा बबनराव पालवे यांचा वाढदिवसानिमित्त लावलेला फलक लक्ष वेधून घेत आहे. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बबनबापू पालवे यांचे चिरंजीव रितेशदादा पालवे आहेत. ते सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. तालुक्यामध्ये पक्षीय राजकारण वेगवेगळे असताना सुद्धा लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना लोकप्रतिनिधी या नात्याने गावातील व वार्डातील विकास कामांविषयी समक्ष भेटून व पत्रव्यवहार केलेला होता. विकासाची दूरदृष्टी असणारे राम सातपुते यांनी विकासकामांना महत्त्व देऊन कामे मंजूर केलेली आहे. त्यामुळे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या कार्यकर्तृत्वामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक तरुण जोडले जात आहेत.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची कार्य करण्याची पद्धत, विचारपूस, सतत संपर्क, पार्टी, पक्ष, जातीभेद न मानता सर्वसमावेशक जनतेसाठी काम केलेले असल्याने माळशिरस तालुक्यात वाढदिवसानिमित्त अनेक गावांमध्ये रितेशदादा निर्माण झालेले पहावयास मिळत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरसचे लोकप्रिय आ. रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त चांदापुरी येथे मोफत आरोग्य तपासणी, रेशनकार्ड शिबीर संपन्न
Next articleविकासरत्न विजय दादांच्या वाटेवरून माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार वाटचाल सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here