नातेपुते ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनता कार्यकर्ते व नेते यांच्यामध्ये दसऱ्यानिमित्त नातेपुते येथील निवासस्थानी शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यात आली.
संपूर्ण देशाला कोरोना विषारी विषाणूने थैमान घालून सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत केले होते. गेली दीड दोन वर्ष कोरोना संसर्ग रोगामुळे शहरासह ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर कोरोनाचे सावट होते. शासनाकडून काही निर्बंध घातलेले होते, त्यामुळे कितीतरी दिवस सार्वजनिक सण-उत्सव, कार्यक्रम यांच्यावर बंदी होती. पण आता महाराष्ट्र शासनाने घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरे खुली केलेली होती. ग्रामीण भागात लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने कोरोना संसर्ग रोग आटोक्यात आलेला आहे. त्यामुळे आदिमाया शक्ती शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झालेला होता. साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी अनेक लोक आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात करीत असतात. दिवसभर मतदार संघातील नवीन व्यवसायिकांनी सुरू केलेल्या व्यवसायांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. सायंकाळी नातेपुते येथील निवासस्थानी लोकांना भेटून शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यात आली. मतदार संघामध्ये सार्वजनिक व व्यक्तिगत अनेक लोकांची कामे आमदार राम सातपुते यांनी केलेली आहेत. त्यामुळे राम सातपुते यांच्यावर व्यक्तिगत प्रेम करणाऱ्या लोकांची जास्त उपस्थिती होती. आमदार राम सातपुते यांनी कोरोना कालावधीमध्ये अनेक लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केलेली होती. केलेल्या कार्यातून उतराई होण्यासाठी दसऱ्याच्या शुभेच्छा देण्याचे निमित्त होते. रात्री उशिरापर्यंत लोकांची शुभेच्छा देण्यासाठी वर्दळ लागलेली होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng