ऊसतोड कामगारांचे अवकाळी पावसाने जनजीवन झाले विस्कळित
अडचणीतील लोकांना मदतीचा आधार, जीवनावश्यक किट वाटप करून दिलासा.
फोंडशिरस ( बारामती झटका )
गेल्या दोन-तीन दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसाळ्या सारखा पाऊस पडलेला होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे अत्यंत नुकसान झाले होते. अनेकांच्या झोपडीमध्ये पाणी शिरले होते. अशा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मदत केली आहे. ऊसतोड कामगारांना शाळा, समाज मंदिर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करून त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य देण्याचे आवाहन केलेले होते. त्याप्रमाणे आमदार राम सातपुते यांचे शिलेदार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत अडचणीतील ऊस तोड मजूर कामगारांना मदत केलेली आहे.

अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या ऊस तोडणी कामगारांना लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे कीट त्यामध्ये गहू, तांदूळ, मीठ, मसाले किट, लहान मुलांना बिस्कीट अशा प्रकारचं किट वाटप भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून फोंडशिरस याठिकाणी ऊसतोड कामगारांना करण्यात आले. यावेळी हरिदास पाटील (फोंडशिरस भाजपा युवा शहराध्यक्ष), विशाल गोरे (फोंडशिरस भाजपा किसान मोर्चाचे शहराध्यक्ष), वैभव रणदिवे, सुनील दाते (सामाजिक कार्यकर्ते), राजू गोरे, अविनाश बोडरे, गणेश ढोबळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng