भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची गोवा विधानसभा प्रचार प्रमुख पदी निवडीबाबत सन्मान.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची गोवा विधानसभा प्रचार प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मळोली करांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, मळोली गावचे माजी पोलीस पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासो जाधव पाटील, शिवपार्वती दूध संस्थेचे चेअरमन साळमुखवाडी चे युवा नेते अंकुशराव देवकाते, प्रगतशील बागायतदार रणजीत माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्याकडे काही दिवसापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली होती अनेक राज्यांचा यशस्वी दौरा करून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी देशातील महत्त्वाची असणारी गोवा विधानसभा या विधानसभेची आगामी निवडणुकीची प्रचाराची जबाबदारी आमदार राम सातपुते यांच्यावर देण्यात आलेली आहे निश्चितपणे जबाबदारी यशस्वी पार पडतील असा विश्वास माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांना असल्यामुळे आमदार राम सातपुते यांचा सन्मान मळोली करांच्या वतीने करण्यात आलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng