लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यावतीने भाजपचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते महादेव कोळेकर यांचा सन्मान

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भाजपचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते महादेव कोळेकर यांचा वाढदिवसानिमित्त माळशिरस येथील शासकीय निवासस्थानी फेटा, शाल, श्रीफळ व हार देऊन सन्मान केला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस शहरामध्ये सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व महादेव कोळेकर यांनी समाजातील वंचित घटकांसाठी नेहमीच कार्य केलेले आहे‌. समाजामध्ये कार्यातून आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. माळशिरस नगरपंचायत निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. मात्र प्रभाग महिलेसाठी आरक्षित झालेला होता. त्या ठिकाणी सौ. पुष्पावती महादेव कोळेकर यांना निवडणुकीत उभे करून सामाजिक कार्य व आ. राम सातपुते यांच्या सहकार्याने माळशिरस नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे.

महादेव कोळेकर यांची राहणी साधी, मात्र उच्च विचारसरणी आहे. त्यांच्याकडे संघटन कौशल्य असल्यामुळे युवकांची मोठी फौज आहे. नेहमी सहकार्य करण्याची भावना असल्याने कार्यकर्त्यांचे जाळे त्यांच्याभोवती नेहमी असते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. संजीवनीताई पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन महादेव कोळेकर यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. संजीवनीताई पाटील यांचे महादेव कोळेकर यांना नेहमी सहकार्य असते. अशा कार्यकुशल कर्तुत्ववान युवा नेतृत्वाचा वाढदिवस माळशिरस शहरात धूमधडाक्यात सुरू आहे.

महादेव कोळेकर यांचे कार्य माळशिरस शहरापुरते नसून त्यांनी तालुक्यात व जिल्ह्यात अनेक मित्र परिवार व हितचिंतकांचे जाळे विणलेली आहे. त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अनेक ठिकाणी वाढदिवसानिमित्त धुमधडाक्यात सत्कार होत आहेत. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आमदार राम सातपुते यांनी समाज सेवक महादेव कोळेकर यांचा सन्मान करून भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा – सौ. रिज़वाना शेख
Next articleफर्जत नेक अर्जुमंत शाहरुख मुलाणी कोळेगाव दुख्तर नेक अख्तर जकीरा बेगम कोरबू वेळापुर इनका निकाह होनेवाला है.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here