लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मंडप कॉन्ट्रॅक्टर वाघमोडे यांच्या तब्येतीची चौकशी करून दिला दिलासा.

सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखातील सहभागाने लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याविषयी आपुलकी, जिव्हाळा व प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मतदार संघातील माळशिरस शहरातील मंडप कॉन्ट्रॅक्टर दादा वाघमोडे यांच्या तब्येतीची चौकशी केली. मंडप कॉन्ट्रॅक्टर दादा वाघमोडे यांचा न्यायालयाच्या इमारत भूमिपूजनाच्या प्रसंगी विजेचा शॉक लागून अपघात झालेला होता.

दादा वाघमोडे यांच्या निवासस्थानी जाऊन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी तब्बेतीची विचारपूस करून गरज भासल्यास आवश्यकत ती मदत करण्याचे सांगितले. यावेळी माळशिरस नगरपंचायतचे बिनविरोध स्वीकृत नगरसेवक युवा नेते आकाशभैय्या भीमराव सावंत, भाजपा माळशिरस शहराध्यक्ष संतोष वाघमोडे यांच्यासह दादा वाघमोडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दादा वाघमोडे यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली असल्याने वाघमोडे परिवारासह तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये आपुलकी, प्रेम, जिव्हाळा निर्माण झाला आहे. आमदार राम सातपुते सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होतात. अडीअडचणीला वेळोवेळी मदत करीत असतात. वेगवेगळी ऑपरेशन करून सर्वसामान्य जनतेला दवाखान्याची मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून मदत करीत असल्याने लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याविषयी आपुलकी जिव्हाळा व प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिजाऊ ब्रिगेडच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleज्येष्ठ नागरिक कृष्णा पवार यांचे माळशिरस येथील पाटबंधारे विभाग कार्यालयासामोर आमरण उपोषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here