सर्व सामान्य जनता व शेतकरी यांच्यासाठी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय व विधान भवनात आंदोलन करणारे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे बारामती येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर आक्रोश आमरण…
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मतदार संघातील व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्यासाठी अनेक वेळा तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय विधान भवनात आंदोलन करून सर्वसामान्य व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. सध्या महावितरणकडून सर्वसामान्य जनतेची डीपी साठी पिळवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने आक्रोश सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कळवळा असणारे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता कार्यालय बारामती येथे आक्रोश आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे ट्विट केलेले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोनासारख्या महाभयंकर संसर्ग रोगाला तोंड देऊन निसर्गाच्या अवकाळी पाऊस, वारा, गारपीट अशा नैसर्गिक घटनेला तोंड देत निसर्गाच्या हातून वाचलेल्या पिकाला जतन करण्यासाठी शेतकरी अहोरात्र रानामध्ये कष्ट करीत आहे. विहिरीमध्ये पाणी असताना सुद्धा पिकाला देता येत नाही. लाईट वेळेवर व जास्त दाबाने सोडली जात नाही, अशी अडचण असताना डीपी वारंवार जळत आहेत. जळालेला डीपी दुरुस्त करण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. महिन्या दोन महिन्याला शेतकऱ्याला महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे भुर्दंड होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमक असणारे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी महावितरणला भानावर आणण्याकरता कंपनीचे मुख्य कार्यालय मुख्य अभियंता यांच्या दालनासमोर आक्रोश आमरण उपोषण करणार असल्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी ट्विट करून विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना टॅग केलेले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng