माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशरस विधानसभेचे लोकप्रिय व दमदार आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून माळशिरस येथील 60 फाटा या ठिकाणी हाय मास्ट दिवा उभारण्यात आलेला असल्याने 60 फाटा परिसर उजळणार असल्याने परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांना निवडणूक कालावधीमध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी अडचणी जाणवत होत्या. त्यांनी निवडणुकीच्या वेळी अडचणी लक्षात घेऊन 60 फाटा या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व माळशिरस शहराच्या विकासप्रिय माजी सरपंच ज्येष्ठ नेत्या ॲड. संजीवनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिवसांचा प्रलंबित असणारा उजेडाचा प्रश्न आमदार रामभाऊ सातपुते यांनी सोडविला आहे.

पुणे-पंढरपूर रोडवर नेहमी वर्दळीचे ठिकाण आहे. याठिकाणी 60 फाटा आहे. या फाट्यावरून अनेक नागरिकांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. यावेळी मुख्य रस्त्यावर येताना अडचण होत होती. ती अडचण आ. राम सातपुते यांनी दूर केली. तसेच सदर ठिकाणी पाटील वस्ती येथे जिल्हा परिषदेची आदर्श शाळा आहे. शाळेचा परिसर अंधाराचा फायदा घेऊन व्यक्ती अथवा वाटसरु अस्वच्छ करणार नाही. उजेडामुळे परिसर स्वच्छ राहणार असल्याने 60 फाटा परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng