माळशिरस (बारामती झटका)
बबन पराडे पाटील रा. संगम यांचे उसतोड कामगार आणण्यासाठी तय्यब मुलाणी यांची गाडी (अशोक लेलंड एम एच ४५ ए एफ १३६८) कुलगुडू (ता. गोकाक, कर्नाटक) येथे गेली होती. त्यावेळी तेथील मुकादम यांनी कामगार देण्यासाठी पराडे पाटील यांच्याकडे पैशांची मागणी केली व लेबर देतो असे म्हणाले. पैसे घेतले त्यानंतर ते कर्नाटकला जाऊन लेबर बसून आहेत ते घेवून येवू असे म्हणाले. पण तेथील परिस्थिती वेगळीच होती. तेथील लेबर काम करत होते. व ज्या मालकाकडे काम करत होते त्या मालकांनी गाडी व गाडी चालक यांना पकडून ठेवले. व चालकाला मारहाण करून त्यांना बांधून ठेवले. गाडी देण्यास नकार दिला आणि लेबर साठी पैशांची मागणी करू लागले. वारंवार संपर्क करूनही त्यांनी आमचे ऐकले नाही. आम्ही त्यांना सागत होतो कि मुकादमाने आम्हाला लेबर देतो म्हणून फसविले. तरीही त्यांनी आमचे न ऐकता चालकाला ३\४ दिवस मारहाण केली. त्यानंतर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क केला असता त्यांनी आमची दखल न घेता कारवाई केली नाही. उलट तुम्ही लेबर नेण्यासाठी इकडे कशाला आला म्हणून आम्हालाच दमदाटी केली. आम्हालाच मुकादमाने फसविले आहे, अशी विनवणी करूनसुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ५\६ दिवसांनी चालकांना सोडून दिले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गाडीची मागणी केली तरीही त्यांनी दखल घेतली नाही. तुम्हाला पैसे मागितले आहेत तर तुम्ही पैसे द्या आणि गाडी सोडवून घ्या असे ते म्हणाले. बऱ्याच वेळा संपर्क करूनही त्यांनी दखल घेतली नाही.
त्यानंतर संगम ता. माळशिरस येथील सरपंच महेश इंगळे यांनी आ. राम सातपुते यांची भेट घेण्यास सांगितले. ते नक्कीच मदत करतील असे सुचविले. त्याप्रमाणे आम्ही आ. सातपुते साहेबांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनी कुलगुडू पोलीस स्टेशनला फोन करून तेथील पीएसआय यांना गाडी सोडण्यास सांगितले. तरीही पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले गाडी सोडली नाही. त्यानंतर तेथील स्थानिक आमदार, डी.वाय.एस.पि., आयजी साहेब यांना आ. राम सातपुते यांनी फोन केला. नंतर कुलगुडू पोलीस स्टेशनचे पिआय आणि दोन कॉन्स्टेबल, गाडी अडवून ठेवलेले मालक आ. राम सातपुते यांची भेट घेण्यासाठी माळशिरस येथे आले. त्यावेळी त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण आ. राम सातपुते आपल्या निश्चयावर ठाम होते. त्यांनी त्यांना कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी ४\५ दिवसांनी गाडी सोडतो असे आश्वासन आ. राम सातपुते यांना दिले. पण त्यांनी १०\१५ होवूनसुद्धा गाडी सोडली नाही.
विधानसभेचे अधिवेशन चालू असूनसुद्धा आ. राम सातपुते साहेबांनी २ महिने कामातून वेळ काढून वेळोवेळी पाठपुरावा केला. तेथील आयजी साहेबांना फोन करून डीवायएसपि यांना गाडी सोडण्याचे आदेश देण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलीसांच्या टीमने उसाच्या शेतामध्ये लपविण्यात आलेली गाडी सोडली. त्यानंतर पोलिसांनी आ. राम सातपुते साहेबांना फोन करून गाडी जमा केल्याचे सांगून गाडी घेवून जाण्यास सांगितले. आ. राम सातपुते यांनी स्वतः फोन करून आम्हाला गाडी सोडवून आणल्याचे सांगून गाडी घेवून येण्यास सांगितले. गाडी मिळण्याची आशा सोडली होती, त्याचवेळी गाडी जमा झाल्याची बातमी स्वतः आ. राम सातपुते यांनी सांगितल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला. लगेच दुसऱ्या दिवशी जावून गाडीमालक गाडी घेवून आले.
आ. राम सातपुते कोणतेही काम हाती घेतले कि ते पूर्ण ताकतीने करून ते यशस्वी करतात. गोरगरीब जनतेचा ते आधारस्तंभ आहेत. ते नेहमीच जनतेला सहकार्य करीत असतात. मग ते कोणत्याही पातळीवरील असो, ते पूर्ण करतातच. यामध्ये सरपंच महेश इंगळे यांच्यामुळे एवढ्या मोठ्या मनाचा दिलदार माणूस जवळून पाहता आला. यासाठी सरपंच महेश इंगळे आणि आ. राम सातपुते साहेबांचे गाडी मालक तय्यब मुलाणी व बबन पराडे पाटील यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng