लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटनांनी मानले केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभार

महापुरुषांच्या यादीत क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे नाव समविष्ट करणार – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मातंग समाजाला आश्वासन

मुंबई (बारामती झटका )

केंद्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव समाविष्ट केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटना आणि प्रतिनिधी नेत्यांनी आज बांद्रा येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची भेट घेऊन जाहीर आभार मानले.

दलीतरत्न म्हणून मातंग समाजाच्यावतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य पुष्पहाराने सन्मान करण्यात आला. जसे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे नाव महापुरुषांच्या यादीत घेतले तसेच आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचेही नाव महापुरुषांच्या यादीत घ्यावे, या मागणीचे निवेदन यावेळी मातंग समाजाच्यावतीने माजी आमदार सुधाकर भालेराव आणि हनुमंत साठे यांच्या नेतृत्वात विविध मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी ना. रामदास आठवले यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेत क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत घेणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र त्याचबरोबर देशभरातील महापुरुषांच्या नावाची दखल घेतली गेली नाही, अशा सर्व नावांसाठी विशेष बैठक घेऊन सर्व नावांची नोंद डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत घेऊ असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेण्यासाठी ना. रामदास आठवले यांनी तातडीने पाऊले उचलली, ते पाहता देशात दलितांचा नेता रामदास आठवले हेच आहेत असे मातंग समाज मानत असल्याचे उपस्थित मातंग समाज प्रतिनिधी यांनी भावना व्यक्त केली. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळण्यासाठी ना. रामदास आठवले प्रयत्न करीत आहेत. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाद्वारे मातंग समाजाला कर्ज देणे सुरू करावे, अशी मागणी यावेळी मातंग समाजाच्यावतीने करण्यात आली. यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव; रिपाइंचे मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हनुमंत साठे, लहुजी वास्तव साळवे समाधी स्मारक समिती अध्यक्ष बापूसाहेब डाकले, दलितमित्र अंकल सोनवणे, अनिल हातागळे, प्रमोद ठोंबरे, नंदू साठे, रमेश शेलार, विरेन साठे, शंकर शेलार, विनोद शिंदे, बिडी चव्हाण आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार संघटनेच्या शाखेची माळशिरस तालुक्यात मुहूर्तमेढ रोवली.
Next articleकृषि विभागाच्या विविध योजनांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा तालुका कृषि अधिकारी – सौ. पुनम चव्हाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here