लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने बार्टीच्या धरतीवर स्वतंत्र संस्था सुरु करावी – आमदार रामभाऊ सातपुते

माळशिरस (बारामती झटका)

मातंग समाजाच्या विकासासाठी समाज कल्याणच्या बार्टीच्या धर्तीवर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने समाजासाठी स्वतंत्र संस्था सुरु करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्राचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी केली. ही मागणी नुकतीच मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रामभाऊ सातपुते यांनी केली. यामुळे मातंग समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मातंग समाजाच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी स्वतंत्र संस्था असावी. त्यामूळे मातंग समाजाला त्याचा नक्कीच फायदा होईल. यामुळेच आमदार रामभाऊ सातपुते यांनी मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या स्वतंत्र संस्थेचा उपयोग होईल असे सांगितले. तर मेडद ता. माळशिरस येथील सामजिक कार्यकर्ते आणि आमदार रामभाऊ सातपुते यांचे कट्टर कार्यकर्ते आबासाहेब भिसे यांनी बोलताना आमदार सातपुते साहेब यांचे खुप कौतुक केलेले आहे.

आबासाहेब भिसे पुढे बोलताना म्हणाले कि, आमदार रामभाऊ सातपुते यांच्या रुपाने माळशिरस तालुक्याला विकासाचा आमदार मिळालेला आहे. त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्यावर माळशिरस तालुक्यातील जनतेचे प्रेम आहे. त्याचप्रमाणे बहुजन समाजात त्यांच्याबद्द्ल खुप आदर निर्माण झालेला आहे. आमदार साहेबांनी दवाखान्यातील विषय घेऊन गरजू लाभार्थ्यांना मदत केलेली आहे. आमदार साहेबांनी मातंग समाजासाठी वेगवेगळ्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्यामूळे मातंग समाजाला लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचा खुप आदर आहे. तर बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था सुरु करण्याच्या आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मागणीमुळे मातंग समाजातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे, अशी माहिती आबासाहेब भिसे यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleह.भ.प. गीतांजलीताई अभंग यांचे माता पिता कृतज्ञ दिनानिमित्त सुश्राव्य किर्तन.
Next articleकेंद्रीय दूरसंचार मंत्री देवुसिंग चौहान यांचा माळशिरस तालुक्यातील भाजपच्या वतीने सन्मान संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here