Home इतर लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी ७८ कोटीचा निधी मतदार संघासाठी मंजूर...

लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी ७८ कोटीचा निधी मतदार संघासाठी मंजूर करून आणला.

माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून सीआरएफ निधीमधून रस्ते व पुलांच्या कामासाठी ७८ करोड रुपये मंजूर करण्यात आले

फलटण ( बारामती झटका)

माढा लोकसभा मतदार संघातील कार्यतत्पर खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून केंद्राच्या सन २०२२-२३ सी.आर.आय.एफ. निधीतून रस्ते व पुलांच्या कामाकरीता रक्कम रु. ७८.०० करोड मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये कुरवली-मांडवखडक-दालवडी-उपळवे-कुळकजाई रस्त्याचे बांधकाम फलटण तालुक्याला जोडणारा (MDR-67) किमी 0/00 ते 26/400 जिल्हा- सातारा 25.00 कोटी, इंदापूर, अकलूज, सांगोला, जत, मेंढगिरी, उमराणी ते राज्य सीमा रस्ता SH-125 किमी 27/00 ते किमी 32/400 आणि अकलूज बायपास किमी 0/00 ते किमी 3/00 ता माळशिरस, जि. सोलापूर ( भाग अकलूज ते वेळापूर) 17.00 कोटी, ODR-95 ललगून नेर रस्त्यावरील प्रमुख पुलाचे बांधकाम ता. खटाव, जि. सातारा., 8.00 कोटी, वाणीचिंचोळे, भोसे, रेड्डे, निंबोणी, येड्राव, मारवडे रोड MDR-69 किमी 33/00 ते 40/600 पर्यंत सुधारणा सांगोला, जि. सोलापूर. 9.00 कोटी MDR 117 ते तरंगफळ, झंजेवाडी, खुडूस, विझोरी, चौंडेश्वरवाडी, अकलूज, सवतगव्हाण, तांबवे, गणेशगाव ते SH-145 रस्ता MDR-175 – किमी 23/00 ते 23/800 किमी 27/700 ते 28/500 आणि 32/800 ते 34/00 पर्यंत सुधारणा (भाग सवतगव्हाण व तांबवे) ता. माळशिरस जि. सोलापूर 4.00 कोटी, वेळापूर तांदुळवाडी ते माहीम MDR-208 किमी 00/00 ते 8/00 रस्ता सुधारणा ता. माळशिरस जि. सोलापूर 5 कोटी, माणगंगा नदीवर लघु पुलाचे बांधकाम MDR-10 ते टाकेवाडी पांगरी वावरहिरे राणंद पळशी पिंपरी ते S.H. – 141 रोड MDR- 47 किमी. 34/800 ता. माण, जि. सातारा 8 कोटी, दहिवडी गोंदवले बुद्रुक नरवणे वडजल वली विरळी झरे रोड MDR 50 कि.मी. 13/100 नरवणे गावाजवळ ता. माण, जि. सातारा 2 कोटी, एकूण रक्कम 78.00 कोटी ची मंजूरी मिळाली आहे.

बराच वर्षापासून मतदार संघातील ग्रामीण भागातील व तालुक्यातील आणि जिल्हापर्यंत जोडण्यात येणाऱ्या प्रमुख रस्ते खिळखिळीत झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, यावर तात्पुरती दुरूस्ती करण्यात येत होती परंतु पुन्हा रस्त्याची अवस्था पूर्वीसारखी होत होती. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या आणि याबाबत केंद्राच्या 2022-23 सी.आर.आय.एफ. निधीतून माढा मतदारसंघातील रस्ते व पुलाच्या कामासाठी 78 करोड रुपये मंजुरी आणली. मतदारसंघातील विकास कामे मंजूर करण्यासाठी खासदार निंबाळकर यांचे प्रयत्न चालू आहेत. लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न मार्गी लागत आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या निरा देवधर पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मतदारसंघातील विशेष करून माळशिरस तालुक्यातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here