मुबंई (बारामती झटका)
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी तृतीयपंथीयांना वंचित बहुजन आघाडी नालासोपारा पुर्व ऑफिसमधून राशन वाटप करण्यात आले असून जवळपास ४० जणांना आज राशन वाटप झालं आहे.

यावेळी प्रमुख उपस्थितीत वसई विरार महानगरपालिका अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, रेणुका सचिन जाधव आदींसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच दुर्गा कांबळे, राजेश्वरी गुप्ता, निशा गुप्ता, गुडिया सोनी, माया प्रसाद, संध्या दुबे, संगीता प्रसाद, आकाश गायकवाड, गौतम कांबळे, प्रतीक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. वरील कार्यक्रम खाना चाहिए फाउंडेशनचे मंगेश सर आणि पारस सर यांच्या विद्यमाने तृतीय पंथीयांना रेणुका सचिन जाधव यांनी धान्य वाटप केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng