सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महादेव घुले यांना मातृशोक.

माळशिरस ( बारामती झटका )
वटपळी कोंडबावी ता. माळशिरस येथील श्रीमती कलावती शंकर घुले यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान सोमवार दि. ११/१०/२०२१ रोजी पहाटे ५ वा. ३० मिनिटांनी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई व आठ नातवंडे असा परिवार आहे. सातारा जिल्हा परिषद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असणारे श्री. महादेव घुले यांच्या त्या मातोश्री होत्या.
श्रीमती कलावती शंकर घुले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर आपल्या मुलांना अडचणीच्या काळात उच्चशिक्षित केलेले आहे.
कै. शंकर घुले यांचे अकाली दुःखद निधन झाले, त्यावेळेस प्राथमिक शाळेमध्ये महादेव घुले हे शिक्षण घेत होते तर कन्या मुक्ताबाई एक वर्षाची होती. अशा कठीण परिस्थितीत कलावती यांनी आपल्या पतीचे दुःख बाजूला ठेवून रथाचे एक चाक निखळले, तरीसुद्धा त्यांनी परिवाराचा रथ यशस्वीपणे सांभाळलेला होता. महादेव घुले हे जिल्हा परिषद शाळेत चौथीमध्ये शिकत होते, दुसरी लहान भावंडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होती. अशा कठीण परिस्थितीत कलावती घुले यांनी आपल्या मुलांचे अडचणीत व प्रतिकूल परिस्थितीत उज्वल भवितव्य घडविलेले आहे. पितृत्व आणि मातृत्व दोन्हीही त्यांनी सांभाळले. लहान मुलांना कधीही वडिलांची आठवण येऊ दिली नाही, अशा दुहेरी भूमिका त्यांनी त्याकाळी निभावलेल्या होत्या. मुलांनीही वडील नसताना आईचे कष्ट, शिकवण्यासाठीची धडपड ही पाहिलेली असल्याने दोन्ही मुलांनी एम एस सी ऍग्री शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामध्ये महादेव घुले एम एस सी ऍग्री झालेले असून सध्या सातारा जिल्हा परिषद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. दुसरा मुलगा सोपानकाका घुले यांना बारावीतून शिक्षण सोडून शेती करावी लागली. सध्या ते उत्तम शेती करणारे प्रगतशील बागायतदार आहेत. तिसरा मुलगा राजू घुले हे एम एस सी ऍग्री शिक्षण पूर्ण करून इंदापूर येथील तालुका कृषी कार्यालयांमध्ये कृषी पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह बुरूंगुले यांच्याशी झालेला आहे. कै. कलावती घुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा स्वर्ग बनवला. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर वटपळी कोंडबावी येथे अग्नि संस्कार दिलेले आहेत. त्यांचा रक्षाविसर्जन (सावडणे) तिसऱ्याचा कार्यक्रम दि १३/१०/२०२१ रोजी सकाळी ७.०० वाजता वटपळी येथे होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng