वडशिवणे येथे ग्रामसभा ठरावात दारूबंदी, मटका व जुगार बंदी करण्यात आली

वडशिवणे (बारामती झटका)

वडशिवणे ता. करमाळा येथे दि. २७/१/२०२३ रोजी सकाळी १० वा. वडशिवणे ग्रामपंचायतचे सरपंच विशाल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत दारूबंदी, मटका व जुगार बंदी करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.

वडशिवणे गावात दारू विकणे हा व्यवसाय चालू आहे. दारू पिल्याने अनेकांच्या घरांमध्ये वाद होवून अनेक घरसंसार उध्वस्त होत आहेत. महिलांना व इतर लोकांना याचा मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे या ग्रामसभेत दारू, मटका व जुगार बंदी करण्यासाठी ठराव मांडण्यात आलेला होता. त्यावर चर्चा विनिमय केल्यानंतर गावात दारूबंदी करण्याचे सर्वानुमते ठरले.

या ठरावाची प्रत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. याप्रतीवर ठरावासाठी सहमत असलेल्या लोकांची नावे आहेत. त्यामध्ये गोरख जगदाळे, गणेश लोंढे, बालाजी देवकर, अशोक जगदाळे, किसन व्हरे, बळीराम जाधव, सावत्या वाघमारे, ज्ञानदेव काकडे, प्रसाद पाठक, गणेश कवडे, शत्रुघ्न मोरे, कृष्णाजी मोरे, सर्जेराव सावंत, समीर जगदाळे, संदीप साळुंखे, विनय भागवत, श्रीराम पन्हाळकर, हनुमंत माने, श्रीकांत पवार, दिगंबर पन्हाळकर, बाळासाहेब काळे, विशाल जगदाळे, बापूराव तळेकर आदींच्या सह्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमानेगाव येथील पाणलोट विकास समितीच्या सचिवपदी राजेंद्र भोगे यांची बिनविरोध निवड
Next articleशिक्षक संघाचे शिक्षक, शाळा, विद्यार्थी पुरस्कार प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here