इंदापूर (बारामती झटका)
इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील पारेकरवस्ती येथे माजी डी.वाय.एस.पी. श्री. अण्णासाहेब बंडगर यांच्या शेतातील दत्त मंदीरात दत्त जयंती भक्तीभावाने साजरी करण्यात आली. त्यामुळे गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते. सकाळी अण्णासाहेब बंडगर व सावित्री अण्णासाहेब बंडगर यांच्या शुभहस्ते रूद्र अभिषेक करण्यात आला. तसेच योगेश पाठक गुरुजी यांच्या शास्त्रशुद्ध मंत्रपठण झाले. या वेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिरालाल पारेकर, पांडुरंग पारेकर, दिलीप भिसे, गोरख निकम, नवनाथ पारेकर, शिवाजी करगळ, माणिक पाटिल, धनाजी पारेकर, तुकाराम पारेकर, ॲड. विनोद पारेकर, दिपक पाटिल, पोपट सर्जेराव पारेकर, सुधीर पारेकर, विनोद सोमवंशी, मोहन पारेकर, गोरख तुपे, प्रशांत कचरे, दशरथ पारेकर, राजु पारेकर, हनुमंत पारेकर व इतर तरूण, महिला व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पडण्यासाठी स्वप्निल पारेकर, गणेश देवकाते, बाबासाहेब पाटिल, अतुल पारेकर, लाला सपकळ, किरण पारेकर, अक्षय जाधव यांचे मोलाचे सहकार्य झाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng