पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथील बाबा जाधव (वय १०२) व पंढरपूर तालुक्यातील तुकाराम दाजी जगताप (वय १०१) या दोन्ही पणजोबांनी शिंगोर्णी येथील श्री. व सौ. मेघाराणी प्रकाश जाधव यांचा मुलगा चिरंजीव अधिराज याचा पहिला वाढदिवस आनंदाने व उत्साहाने साजरा केला. यावेळी पणजोबा या नात्याने वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून एकत्रित येऊन अनाठायी खर्चाला फाटा देऊन उपस्थितांच्या हातात एक-एक रोप देऊन आपल्या पणतुचे नातेवाईकांसमवेत औक्षण केले.
या कार्यक्रमाला जाधव परिवाराने तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत अनाठायी खर्च टाळून जमलेल्या बाळगोपाळांना चविष्ट स्नेहभोजन देऊन प्रत्येकाने अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करण्याचा आप्तेष्टांना विनंतीवजा संदेश दिला. वाढदिवसाचनिमित्त केलेल्या या अभिनव उपक्रमाचे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng