वसंतराव नाईक महामंडळातर्फे कुसमोड येथील लाभार्थ्यांना कर्ज मंजूर- धैर्यशील मोहिते पाटील

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील वीस लाभार्थ्यांना वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती महामंडळातर्फे कृषी संलग्न व पारंपारिक लघुउद्योग व मध्यम उद्योग व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाख रुपयेप्रमाणे वीस जणांना वीस लाख रुपये कर्ज मंजूर झाले आहे.

हे कर्ज बिनव्याजी आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे भाजपा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश होनमाने, ग्रामपंचायत सदस्य पोपट कचरे, देविदास धायगुडे, अनिल धायगुडे यांनी पाठपुरावा केला.

कुसमोड येथील सर्वसामान्य लोकांची व्यवसायातून सुधारणा व्हावी, यासाठी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर, महामंडळाच्या व्यवस्थापिका काळे मॅडम यांच्या समितीने सदरचे कर्ज मंजूर केले. सदरच्या योजनेतून कर्ज मंजूर करण्यासाठी डॉ. उत्तमराव सरगर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब धायगुडे, महादेव बंडगर, नारायण चव्हाण, रमेश देशमुख, विकास सरगर, माजी सरपंच शशिकला लोखंडे, चंद्रकांत पवार, दादासाहेब पवार, अरुण पवार, विलास लोखंडे, जगदीश गायकवाड, बाळासाहेब कपने, दिगंबर चौगुले, सुनील बोडरे, बापू बोडरे, अक्षय मोरे, नितीन लेंगरे, नभाजी मदने, पोपट काळभोर यांचे विशेष सहकार्य लाभले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहारांच्या शौर्याच्या इतिहासाला कलंकित करून त्यांच्या गळ्यात गाडगे मडके अडकवू नका…
Next articleउद्योग प्रकल्प – म्हसवड – धुळदेव इथंच झाला पाहिजे, आंदोलन कर्त्यासमोर आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड. एम. एम. मगरसाहेब यांनी मांडली भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here