वसुंधरेच्या रक्षणाबरोबरचं उत्तम आरोग्यासाठी न घाबरता लसीकरण करा; अंकिता शहा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

शासनाच्या नियमानुसार सध्या प्रत्येक शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी लस टोचून घेऊन आपला सहभाग द्यावा. लस घेतल्यानंतर गाफील न राहता शासनाने घालून दिलेले निर्बंधांचे तंतोतंत पालन करुन विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरही मास्क व सॅनिटायझरचा वापर हा कटाक्षाने करावा असे आवाहन इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले आहे.

सोमवारी दि.०३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज मधील २ ते अडीच हजार विद्यार्थ्यांशी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी संवाद साधला. दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपला परिसर आणि शहर हरित करण्यासाठी पुढे यावे यासाठी त्यांना वसुंधरेची शपथ देण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.

अंकिता शहा म्हणाल्या की, दिल्ली दरबारी आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी आपली कंबर कसली आहे. 2022 च्या अभियानात पुन्हा एकदा देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळविण्याच्या दृष्टीने इंदापूर नगरपरिषद सध्या विविध उपक्रमांवर भर दिला आहे. कोरोनाच्या छायेमुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. शहर कचरा मुक्त करुन सुंदर व हरीत करण्याच्या दृष्टीने आणि कोरोना काळात सर्वांनाचा स्वच्छतेचे महत्व पटल्याने आपण प्रत्येकाने शिक्षणाबरोबर आपल्या आरोग्याची सुध्दा काळजी घेत आपला परीसर,आपली शाळा आणि आपले शहर हे स्वच्छ ठेवून कचरामुक्त करुन रोगराई मुक्त कसे होईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. इंदापूर नगरपरिषद राबवत असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत तसेच माझी वसुंधरा अभियानात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, मुख्याध्यापक विकास फलफले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांसह इंदापूर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनारायणदास रामदास हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात; दीर्घ प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा झाला प्रारंभ
Next articleवाढदिवसाला समाज उपयोगी उपक्रम राबवून युवकांनी वाढदिवस साजरा करावा – बाबासाहेब माने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here