माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी माणिकबापू वाघमोडे यांच्याकडे कायम.
माळशिरस तालुका प्रभारी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली.
बारामती झटका वृत्ताची दखल, प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांची समजूत काढण्यात यशस्वी.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांची माळशिरस तालुक्यात परिवार संवाद यात्रा येणार होती. यात्रेच्या पूर्वसंध्येला बारामती झटका वेबपोर्टलवर माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे राजीनामा देणार, असे वृत्त प्रकाशित केलेले होते. प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील तालुका अध्यक्ष माणिक बापू वाघमोडे यांची समजूत काढण्यात यशस्वी झालेले आहेत. माणिकबापू यांना जयंतराव पाटल यांनी आश्वासन दिले, वस्ताद नगरपंचायतची चूक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये होणार नाही. माळशिरस तालुका प्रभारी म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील पालकमंत्री दत्तामामा भरणे, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, माणिकबापू वाघमोडे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. माणिकबापू यांनी माळशिरस व नातेपुते येथील पदाधिकाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. तालुका अध्यक्ष यांना वगळून राष्ट्रवादीचे बी फार्म नगरपंचायत निवडणुकीत आलेले असल्याने निष्ठावान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे. पक्षासाठी लोकसभेला विधानसभेला काम केले. मात्र, स्वतःच्या गावात नगरपंचायतला अपक्ष उभारण्याची वेळ तालुका अध्यक्ष यांच्यावर येते आणि विजयाच्या जवळ जाऊन पराभव होत आहे. 30 मताने पराभव झाला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 50 मते पडलेली आहे, अशी दयनीय अवस्था नातेपुते व माळशिरसमधील इतर नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर कार्यकर्त्यांची कदर करणार नसतील तर पक्षात राहून काय करायचे, यासाठी माझा राजीनामा घ्यावा. राष्ट्रवादी व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराशी बांधील असल्याचे माणिकबापू वाघमोडे यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना जबाबदार धरलेले होते. सर्व कार्यकर्त्यांना विश्वास दिला, नगरपंचायतमध्ये झालेली चूक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये होणार नाही. थोड्याच दिवसात तालुका व जिल्ह्याच्या शासकीय कमिट्या होणार आहेत, त्यामध्ये निम्म्या कमिट्या आपण सुचवाल त्या कार्यकर्त्यांना दिल्या जातील. इथून पुढे आपली सर्वस्वी जबाबदारी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे सोपवत आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना तालुका अध्यक्ष यांना अपक्ष निवडणूक लढवणे हे माझ्या सुद्धा बुद्धीला पटत नाही. परंतु, जे झालं ते झालं इथून पुढं असे होणार नाही, असे सांगून माणिकबापू वाघमोडे यांची समजूत काढलेली आहे. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना भाषणांमध्ये माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी माणिकबापू वाघमोडे यांच्याकडे कायम केली असल्याचे सांगितले.
माळशिरस तालुका अध्यक्ष माणिक बापू वाघमोडे यांची व्यथा बारामती झटका वेबपोर्टल यांनी प्रसारित केलेली होती. वृत्ताची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांच्याशी संपर्क करून सायंकाळी चर्चा केलेली असल्याने तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांनी बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल परिवारांचे आभार मानलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng