वाघमोडे पाटील व रुपनवर पाटील आणि वाघमोडे पाटील व सरक यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला.

उत्तमराव जानकर, रामहरी रुपनवर, मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, मच्छिंद्रआबा ठवरे, अर्जुनसिंह मोहिते पाटील, किशोरभैय्या सुळ पाटील, सोपानकाका नारनवर, मामासाहेब पांढरे, डॉ. मारुती पाटील, सुरेशआबा पालवे पाटील, बाळासाहेब लवटे पाटील, गौतमआबा माने, हनुमंतराव सूळ, ॲड. सोमनाथ वाघमोडे, सुधीर काळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती.

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. मधुकर भानुदास वाघमोडे पाटील फोंडशिरस यांची सुकन्या चि.सौ.कां. डॉ. वर्षाली व श्री. श्रीकृष्ण लक्ष्मण रुपनवर पाटील एकशिव यांचे चिरंजीव डॉ. जयराम आणि श्री. गौतमभाऊ वाघमोडे पाटील फोंडशिरस यांचे द्वितीय चि. नितीन व श्री. आनंदराव वसंत सरक फोंडशिरस यांची द्वितीय कन्या चि. सौ.कां. गौरी यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 09/07/2022 रोजी दु. 02 वाजून 05 मिनिटे या शुभ मुहूर्तावर चैतन्य मंगल कार्यालय, नातेपुते दहिगाव रोड, ता. माळशिरस येथे संपन्न झाला.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनवर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे सभापती मच्छिंद्रआबा ठवरे, रूपालीताई बेंदगुडे, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, किशोर भैय्या सुळ पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी उपसभापती सुभाष कुचेकर, शिवामृत दूध संघाचे व्हाइस चेअरमन सावता भोपे, नीरा भीमा साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन विलास बापू वाघमोडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, माळशिरसचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ, लोणंद पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, गौतमआबा माने, सुभाष रणवरे, माऊली पाटील, अजय सकट, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केशव कदम, माजी संचालक सुधीर काळे, दादासाहेब घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशआबा पालवे पाटील, सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धाईंजे, बीड जिल्हा परिषद सदस्य बालाजी धायगुडे, शिवप्रसाद डेअरीचे अध्यक्ष उद्योजक शरदबापू मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, माळशिरसचे माजी नगरसेवक आप्पासो उर्फ मारुती देशमुख, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंगतात्या वाघमोडे, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलास आद्रट, शिवाजी गोरे, बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, रासपचे नेते अण्णासाहेब रुपनवर, नितीनदादा धायगुडे, नागरी आघाडीचे आरिफखान पठाण, शेतकरी पतसंस्थेचे चेअरमन भजनदास चोरमले, एकशिवचे सरपंच शहाजीदादा धायगुडे, उंबरे दहीगावचे सरपंच विष्णुपंत नारनवर, मेडदचे सरपंच नथाआबा लवटे, माजी सरपंच युवराज झंजे, फोंडशिरसचे सरपंच पोपटराव बोराटे, सरपंच दादासाहेब रणदिवे, मारकडवाडीचे सरपंच अण्णासो पाटील, बांगर्डेचे सरपंच शंकर मेटकरी, पळसमंडळचे सरपंच दत्तात्रय करे, आर.एस. वाघमोडे, कुरबावीचे नेते मारुती रुपनवर पाटील, शिंदेवाडी सोसायटीचे चेअरमन खंडूआप्पा वाघमोडे, शिंदेवाडीचे नेते किशोर रणवरे, उद्योजक दत्तात्रय शेळके, सतीश तात्या ढेकळे, संतोषआबा वाघमोडे पाटील, माजी सरपंच शांतिनिकेतन साळवे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ रूपनवर, संपादक प्रमोद शिंदे, प्रशांत खरात, सचिन रणदिवे, बारामती झटका युट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शुभ विवाह सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, श्रीराम शिक्षण संस्थेचे प्रकाशबापू पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पै. अक्षयभैय्या भांड आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.

फोंडशिरस पंचक्रोशीतील आजी माजी पदाधिकारी, विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी विशेष करून वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

सदर शाही शुभविवाह सोहळ्यास वरूण राजानेसुद्धा हजेरी लावलेली होती. सदर शुभविवाह सोहळ्याचे शब्द सुमनांनी स्वागत विठ्ठल सूर्यवंशी यांनी केलेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleWhich is the reason fisherman’s resource group Checking Things For the Thoughts
Next articleआषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here