वाघोलीची १००% लसीकरणाकडे वाटचाल


वाघोली (बारामती झटका)

वाघोली ता. माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत दिली जाणारी कोविशील्ड व कोवॅक्सिन चे लसीकरण १००% होण्याच्या मार्गावर असून वाघोली गावचे व पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, लवंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष खडतरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उपकेंद्र वाघोलीच्या समुदाय अधिकारी श्रीमती रेणुका पाखरे, आरोग्य सेवक कलधोने, सरतापे, आरोग्य सेविका एस. टी. उकरंडे, आशा सेविका सारिका सरवदे, उज्वला निकम, कमल कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश शेंडगे, मल्हारी जाधव, दादा गायकवाड, बलभीम ओहळ, जिल्हा परिषद आदर्श शाळेचे उपशिक्षक श्री. ज्ञानेश्वर मिसाळ, राजेंद्र मिसाळ, सुभाष चव्हाण, जगदीश मिसाळ यांनी अतोनात प्रयत्न करून वाघोली गावातील वय वर्ष १८ पासून पुढील वयोगटातील ५१५० पैकी ४५५० नागरिकांना कोविडची लस दिली असून लवकरच वाघोली गावचे लसीकरण १००% करण्याचा मानस आरोग्य कर्मचारी यांनी केला असून लसीकरणास गावातील युवक वर्गाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकृषीदूत श्रीराम पाटील यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना माती परिक्षणाविषयी दिली माहिती
Next articleबारामती येथील महिला रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here