वाघोली (बारामती झटका)
वाघोली ता. माळशिरस येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील श्री. सागर भारत मिसाळ यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानुसार पदवीचे शिक्षण पूर्ण होताच UPSC अभ्यास सुरू केला. २०१९ च्या पहिल्या प्रयत्नात पोलीस अधीक्षक पदापर्यंत मजल गाठली. सागर मिसाळ यांची पोलीस अधीक्षकपदी उत्तरांचल येथे नियुक्तीही झाली होती. परंतु, जिल्हाधिकारी व्हायचेच या महत्वकांक्षेने पछाडलेले सागर मिसाळ यांनी परत एकदा UPSC ची परीक्षा दिली आणि त्यातही यश प्राप्त केले होते. दि. २३ नोव्हेंबर रोजी UPSC निवड समितीने पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात वाघोली ता. माळशिरस येथील श्री. सागर भारत मिसाळ यांची जिल्हाधिकारी पदावर निवड झाल्याचे जाहीर केले आहे. श्री. सागर भारत मिसाळ सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील होतकरू व जिद्दी स्वभावाचे असून त्यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे समस्त वाघोली व पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.
माळशिरस तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून श्री. सागर मिसाळ यांनी मिळवलेल्या यशाबद्धल अभिनंदन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng