वाघोली (बारामती झटका)
वाघोली ता. माळशिरस येथील संभाजी ब्रिगेडच्या व मुद्रा उद्योगसमूहाच्या वतीने सनदी अधिकारी सेवानिवृत्त व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघोली गावचे सुपुत्र भारतरावजी बलभीमरावजी शेंडगे साहेब, केंद्रीय विद्यालय पुणेचे उपशिक्षक सतीश वसंतराव मिसाळ, विजयसिंह मोहिते विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवाजी मिसाळ, साखर कारखान्याचे अकाउंट विभागाचे क्लार्क श्रीमंत पाटोळे व वाघोली विकास सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्यांचा तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सहशिक्षकांचा सन्मान सोहळा संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन बापू जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यथोचित सन्मान सोहळा संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य व वाघोली गावचे मार्गदर्शक सूर्यकांत आप्पा शेंडगे, शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचे माजी संचालक व जनसेवा संघटनेचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष माणिक बापू मिसाळ, शंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक भगवानराव मिसाळ, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने साहेब, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश बापू शेंडगे या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले १) सोनाली यादव, २) सोयब रज्जाक मुलाणी, 3) समर्थ सुभाष चव्हाण व सहशिक्षकांचा तसेच विकास सेवा सोसायटी चे नूतन चेअरमन अशोकराव चंद्रकांत चव्हाण व व्हा. चेअरमन रामचंद्र भगवान मिसाळ व विकास सेवा सोसायटीच्या सर्व नूतन संचालकांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यासाठी उपस्थित वाघोली गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पवार, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे पाटील, शेतकरी बँकेचे संचालक सुदर्शन मिसाळ, विजयसिंह मोहिते विद्यालय प्रशाला समितीचे सभापती चंद्रसेन मिसाळ, ग्रामपंचायत माजी सदस्य योगेशजी माने शेंडगे, युवा नेते तुषार पाटोळे, डॉ. अमोल माने, इंजिनियर बबनराव शेंडगे साहेब, युवा नेते सुदर्शन प्रभाकर मिसाळ, वाघोली गावचे पोलीस पाटील प्रदीप मिसाळ, मा. उपसरपंच सतीश दत्तात्रय मिसाळ, तालुका कृषी अधिकारी नितीनजी चव्हाण साहेब, विकास सेवा सोसायटीचे मा. चेअरमन दिलीप मिसाळ, तसेच भारत पवार, संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते रणजीत पवार, मा. उपसरपंच शंकर शेंडगे, सहशिक्षक सुभाष चव्हाण सर, मा. बँक इन्स्पेक्टर लोंढे साहेब, विकास सेवा सोसायटीचे सचिव जाधव साहेब, वाघोली गावाचे उपसरपंच कालिदास मिसाळ, जि. प. प्राथमिक शाळा वाघोली प्रशाला समितीचे अध्यक्ष नवनाथ मिसाळ, विकास सेवा सोसायटीचे मा.चेअरमन हरिदास पाटोळे, प्रगतशील बागायतदार मारुती नाना मिसाळ, विकास सेवा सोसायटीचे मा. चेअरमन माणिक पवार, प्रगतशील बागायतदार सतीश आण्णा गोसावी, सिद्धेश्वर पाटील, रमेश पाटील, रविराज मिसाळ, सादिक बागवान, वैष्णवी कृषी केंद्र खताचे डीलर सतीश मिसाळ, प्रगतशील बागायतदार रामभाऊ मिसाळ, कुंडलिक मिसाळ, शंकर हरिबा मिसाळ, वाघोली गावचे माजी सरपंच लक्ष्मण पारसे, अशोक, दत्तात्रय, हनुमंत मिसाळ, व्यवहारे, रेवण पवार, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच वाघोली, वाफेगाव, कान्हापुरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी सुरेश पवार, सुभाष चव्हाण सर, खांडेकर सर (कान्हापुरी), सत्कार मूर्ती भारतराव बलभिमराव शेंडगे साहेब (अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे ) यांनी सर्व ग्रामस्थांना आपल्या शासकीय सेवेत केलेल्या कामाचा लेखा जोखा सांगून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन मुद्रा समूहाचे उद्योजक सचिन (दादा) मिसाळ यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर (बापू ) मिसाळ यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng