वाघोली येथील विजयसिंह मोहिते विद्यालयाचा एसएससी बोर्डाचा १००% निकाल

वाघोली (बारामती झटका)

मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून वाघोली ता. माळशिरस येथील विजयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. या विद्यालयातील कु. सोनाली रेवन यादव हिने ९४.६० गुण प्राप्त करून प्रथम, शोएब रजाक मुलाणी याने ९२% गुण प्राप्त करून द्वितीय तर समर्थ सुभाष चव्हाण याने ९१.८०% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

या विद्यालयाचे एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ९०% च्या पुढे १०, ७५% च्या पुढे ३९ तर प्रथम श्रेणीत १६ विद्यार्थी पास झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक यांचे अभिनंदन शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक मा. जयसिंह मोहिते पाटील, सदस्या स्वरूपारणी (दीदी) शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजित रनवरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रसेन मिसाळ, मुख्याध्यापक, सर्व सदस्य यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचाकोरे येथे ह.भ.प. दत्तात्रय गलांडे महाराज, लासुर्णेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन
Next articleपुरंदावडे सोसायटीवर मोहिते पाटील गटाचा झेंडा, चेअरमनपदी बाळासाहेब सुळे पाटील तर व्हा. चेअरमनपदी दादासो अर्जुन यांची बिनविरोध निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here