वाघोली येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

वाघोली (बारामती झटका)

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त वाघोली येथे छञपती चौकात शिवभक्ताच्या व संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ ग्रामस्थांच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छञपती शिवाजी महाराजाच्या व राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाचे पुजन संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप, पं. स. सदस्य शिवश्री सुर्यकांत शेंडगे अप्पा, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवश्री भगवान मालक मिसाळ-पाटील, जनसेवा संघटना महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री माणिक बापू मिसाळ, अकलूज कारखान्याचे तज्ञ संचालक शिवश्री सतीश बापू शेंडगे, ह.भ.प. भजनदास तात्या मिसाळ, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विष्णु वासुदेव मिसाळ यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्याची सुरवात जिजाऊ वंदना घेऊन करण्यात अली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रावणी मिसाळ आणि पुजा देवकर या मुलीने जिजाऊचे विचार मांडले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप यांनीही जन्मोत्सव निमित्त विचार मांडले. ही सदर कार्यक्रमास प्राथमिक शाळेतील व विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली शाळेतील विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबदल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोविडच्या काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सर्व डॉक्टर्स, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व सर्व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या वेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री दिगंबर मिसाळ, ता. उपाध्यक्ष शिवश्री सचिन पराडे-पाटील, तालुकाध्यक्ष कामगार आघाडी शिवश्री अजय गायकवाड, गट प्रमुख शिवश्री रविराज पराडे-पाटील, ह.भ.प. शिवश्री भजनदास तात्या मिसाळ, ग्रा.पं. सदस्य शिवश्री दिगंबर माने शेंडगे, माजी उपसरपंच शिवश्री रघुनाथ मिसाळ, ग्रां. पं. सदस्य शिवश्री योगेशजी शेंडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे वाघोली अध्यक्ष शिवश्री नवनाथ मिसाळ, शिवश्री हणमंत मिसाळ, माजी उपसंरपच, सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी कला सांस्कृतिक उपाध्यक्ष शिवश्री हणुमंत पाटोळे, गणेश शेंडगे व विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली सभापती शिवश्री चंद्रसेन मिसाळ, शिवश्री सुदर्शन मिसाळ, शिवश्री गुरुदेव मिसाळ, शिवश्री गणेश शेंडगे सर्व बंधूभगिनी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री सुभाष चव्हाण यांनी केले व आभार संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गातील गट नंबर 1059 क्षेत्राची चौकशी करावी – दीपक माने देशमुख.
Next articleसहकार महर्षीं शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकार समृद्ध केला – चंद्रकांत जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here