सविताताई खांडेकर यांना लोणारी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित केले
वाफेगाव (बारामती झटका)
वाफेगाव ता. माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे यावर्षीही पितामह समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचा जयंती उत्सव दि. ८ जानेवारी २०२२ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिजाऊ ग्रुपच्या पुणे अध्यक्षा सविताताई खांडेकर यांना “लोणारी समाज रत्न” पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि प्रा. कुदळे सर लिखित लोणारी समाज पुस्तक ज्यामध्ये समाजाचा इतिहास आणि वर्तमान याचा सविस्तर अभ्यास आहे हे सर्व देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब कर्चे यांनी केले तर प्रस्तावना अमोल शिंदे यांनी केली. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर पंढरपूरचे नगरसेवक नवनाथभाऊ रानगट, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत राणे, कान्हापुरी गावच्या माजी सरपंच स्मिता पाटील, माळशिरस तलाठी संघटनेचे अध्यक्ष अनिल घेरडे, श्रीपुरचे उद्योजक संजय काळेल, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक मारुतीनाना घोडके, वाफेगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रघुनाथ शिंदे, वाफेगावचे माजी सरपंच दत्तात्रेय हेंबाडे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय चव्हाण, माजी उपसरपंच अरुण शिंदे, सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे वाहतूक संघाचे संचालक आगतराव बळी शिंदे, उपसरपंच मधुकर यादव, पोपट यादव, किसन गायकवाड, बापूराव गोडसे दादासाहेब शिंदे, महारुद्र काळेल, दैवत काळेल, कल्लप्पा कुटे, बापूसाहेब दगडे, तानाजी दगडे, दयानंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बापूराव शिंदे, संभाजी सरवदे, एकनाथ शिंदे यांनी विष्णुपंत दादरे साहेब यांच्या जीवनावरती आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या वेळी आभार प्रदर्शन महेश शिंदे व दत्तात्रय शिंदे यांनी केले. यावेळी वाफेगाव पंचक्रोशीतील लोणारी समाज बहुसंख्येने उपस्थित होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng