अकलूज येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून नो कंम्प्लेंन डे टीमचा केला सन्मान

अकलूज (बारामती झटका)

अकलूज शहर येथे दि. ६ मार्च २०२२ राेजी पाेलीस स्टेशन, अकलूज यांच्या सहकार्याने व पाेलीस मित्र परीवार, ग्रामसुरक्षा दल, एनसीसी कॅडेट यांच्या सहकार्याने शिवामृत दुध संस्थेचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हाेता. त्या दिवशी अकलूज पाेलीस स्टेशनला सकाळी ०६.०० ते सायंकाळी ०६.०० पर्यंत एकही पाेलीस दाखल झाले नव्हते. सर्व नागरीक, व्यापारी वर्ग, डॉक्टर्स, वकील तसेच मान्यवर संघटना, पक्ष, सर्व राजकीय नेते, उपनेते व आजी माजी मान्यवर नेते यांचे सहकार्य लाभले हाेते.

ही बाब तालूक्यातून, जिल्ह्यातून आणि राज्यातून पहील्यांदाच नाे कंम्प्लेन डे म्हणजे शांतता दिवस म्हणून साजरा करण्यात आला हाेता. यात संपूर्ण टीम सूमारे ४०० ते ४५० महीला, यूवा वर्ग व पूरूष असे शहरातील चाैकाचाैकात व गल्लीबाेळात, राेडवर फिरून व पाेलीस स्टेशन जवळ कक्ष उभारून काम करीत हाेते. याअलाैकीक सांघीक कार्याने पाेलीस स्टेशनचा एक दिवसाचा भार व माननीय काेर्टाचा वेळ वाचविला आहे. या सामाजीक उपक्रमाची दखल तातडीने घेवून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह माेहीते पाटील समक्ष भेट देण्यासाठी त्याच दिवशी येणार हाेते परंतू, महत्वाच्या कामामूळे भेट राहून गेली हाेती. पण त्यांनी त्याच दिवशी टीमला शुभेच्छा दिल्या हाेत्या. त्याच दिवशी मा. धैर्यशिल माेहीते पाटील यांनीही शूभेच्छा दिल्या हाेत्या. आज धैर्यशिल माेहीते पाटील यांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण तालूक्यातून आणि जिल्हातून वाढदिवसाच्या शूभेच्छांचा प्रचंड वर्षाव व हितचिंतक मित्र मंडळीची रांग लागलेली असतानाही खास वेळ काढून या सामाजीक कार्याला व नाे कंम्प्लेन डे टीमला मात्र अग्रक्रमाने शुभेच्छा देवून प्रशंसापत्र ही दिलेले आहे.
लवकरच ही टीम आता संबंध तालूका व जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नाे कंम्प्लेन डे साजरा करतील यात शंकाच नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज विकास सेवा सोसायटीची व्यवस्थापक समिती निवडणूक बिनविरोध.
Next articleपिसेवाडीतील माळी समाजाची पैशापेक्षा पक्ष व नेत्यांवरील निष्ठा श्रेष्ठ ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here