कण्हेर येथील पै. कालीदास रुपनवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणीस उदंड प्रतिसाद.
कण्हेर ( बारामती झटका )
आजच्या तरुण पिढीने वाढदिवसाला समाज उपयोगी उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेला वाढदिवसानिमित्त राबविलेल्या उपक्रमाचा फायदा व्हावा, असे समाज उपयोगी उपक्रम राबवून युवकांनी वाढदिवस साजरा करावा असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी येथील पैलवान कालिदास रुपनवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.

कण्हेर गावचे युवा नेते पैलवान कालिदास रुपनवर पाटील यांनी वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर, ज्येष्ठ नेते उमाजी मिसाळ, दादा महाराज माने, पांडुरंग महानवर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, युवा नेते दादासो माने, गोरडवाडीचे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, पैलवान सचिन माने, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अभिजीत केंगार, महेश काळे, प्रताप माने, मांडवे गावचे युवा नेते सुरेश गोरे, समाधान काळे, अंकुश माने आदी मान्यवरांसह पैलवान कालिदास रुपनवर पाटील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एच. व्ही. देसाई रुग्णालय मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे येथील डॉ. अविनाश अडके, नेत्रचिकित्सक महावीर सोनवणे, रोहन खरात, नितीन वाघमारे आदी डॉक्टर मंडळी रुग्णांची नेत्रतपासणी करीत आहेत. ग्रामीण भागामध्ये नेत्र तपासणी होत असल्याने उदंड प्रतिसाद नेत्र तपासणीसाठी लोकांनी दिलेला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत 100 रुग्णांनी नेत्र तपासणी केलेली आहे. दिवसभरामध्ये अनेक नागरिक नेत्रतपासणीचा फायदा घेतील. आलेल्या सर्व नागरिकांची सेवा पैलवान कालिदास रुपनवर पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्याचे सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng