वाफेगाव सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी हनुमंत चव्हाण तर, व्हाईस चेअरमनपदी संभाजी सरवदे यांची निवड.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अकलूज ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, याच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची बिनविरोध परंपरा कायम राखलेली आहे.

वाफेगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन हनुमंतराव सज्जन चव्हाण व व्हाईस चेअरमनपदी संभाजी दिगंबर सरवदे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी श्री शंकर सहकारी साखर काखान्याचे संचालक श्री. दत्तात्रय चव्हाण, वाफेगांवचे माजी सरपंच श्री. दत्तात्रय हेंबाडे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक श्री. मारूती घोडके, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री. विठ्ठल गायकवाड, भाजपचे तालुका उपाध्यक्ष श्री. संगाप्पा शिंदे, नागनाथ गोडसे, नितीन शिंदे, किसन गायकवाड, कुंडलिक शिंदे, कुंडलिक गायकवाड यांची उपस्थिती होती.
हनुमंत सज्जन चव्हाण चेअरमन तर संभाजी दिगंबर सरवदे व्हाईस चेअरमन, महावीर पोपट हेंबाडे, नागनाथ पोपट शिंदे , विष्णु अमरसिंह, भाई कुमार, विश्वंभर जाधव, शिंदे रघुनाथ माधव, यादव पार्वती जिवराज, शिंदे जनार्दन गोंदिया, शिंदे दिलीप नारायण, सुर्यवंशी सिताबाई पांडुरंग, गायकवाड संभू महादेव, गायकवाड साधू अर्जुन असे नवनियुक्त संचालक आहेत. तज्ञ संचालक दयानंद बाबुराव शिंदे यांची नियुक्ती केलेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. जयसिंह मोहिते पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सोसायटीची पन्नास वर्षाची बिनविरोध निवड होण्याची परंपरा कायम राखली. सोसायटीचे सचिव श्री. जाधव आणि श्री. कीर्तने तसेच सोसायटीचे शिपाई श्री. मधुकर गाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराम यांनी रुद्रचे जिंकलेले हृदय, संस्कृती यांनी रुद्रला हृदयापासून हसवुन ह्रदय फुलवले.
Next articleसहकार महर्षी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी विजय मंडलिक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here