वासोट्या इतकीच खबरदारी सर्व गडकिल्ल्यांवर घेण्यात यावी, वनविभागाचे केले कौतुक

व्यसनमुक्त ५०० युवकांसह बंडातात्यांनी केली वासोटयावर चढाई.

वासोटा (बारामती झटका)

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संघटनेच्यावतीने दर महिन्याला ट्रेकिंगचे आयोजन केले जात असून विविध गडकिल्ले व डोंगरदर्‍यात वसलेल्या अनेक आध्यात्मिक स्थळांना भेटी देवून त्यांचा इतिहास समजून घेवून युवकांच्या मनामधे राष्ट्रपुरूषांचे ज्वलंत कर्तुत्व निर्माण व्हावे, यासाठी या मोहिमा आयोजित केल्या जात असल्याचे मत युवकमित्र बंडातात्या कराडकर यांनी यावेळी व्यक्त केले.
व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती, युवाशक्ती या त्रिवेणी सुत्राद्वारे व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य बंडातात्या कराडकर हे करीत असून त्यांनी यापुर्वीही आग्रा ते राजगड, पन्हाळगड ते विशाळगड, धर्मवीरगड ते तुळापूर, पुरंदर ते तुळापुर, संगमेश्वर (रत्नागिरी) ते तुळापूर, महाराष्ट्राचे एवरेस्ट कळसुबाई शिखर, सदाशिवगड ते चौरंगीनाथ, जोशींमठ ते संतोषगड, हरेश्वर ते केदारेश्वर अशा अनेक पायी मोहीमा यशस्वी केल्या आहेत.
वासोटा मोहिमेसाठी महाराष्ट्रभरातून ४८९ युवक बामणोली येथे एकत्र आले होते. तेथून ३० बोटीतून वासोट्यापर्यंतचा प्रवास करून अवघ्या एक ते दिड तासात वासोटा गडाची चढाई पूर्ण झाली.
या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असून त्यानिमित्ताने व्यसनमुक्त युवक संघ अनेक मोहिमा राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. वासोटा किल्यांवर होणारी कडक तपासणी सर्व गडकिल्ल्यांवर झाल्यास तेथिल स्वच्छतेबरोबरच पावित्र्यही चांगले राहिल असे सांगून येथील अधिकारी कुंभार व कर्मचार्‍यांचे कौतुक केले. यावेळी व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष श्री. दिपक जाधव यांनी दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ ते क्रांतीसिंहाची जन्मभूमी येडेमछिंद्र खिंड सायकल रॅली आयोजित केल्याची माहिती दिली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करा – राज्यमंत्री दतात्रय भरणे
Next articleनवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी भाजपाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here