विजय नलवडे यांचे प्रथम पुण्यस्मरण सामाजिक उपक्रमाने संपन्न

चाकोरे (बारामती झटका)

चाकोरे ग्रामपंचायत सदस्य कै. पै. विजय (दादा) नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ विजय नलवडे मित्र मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. दत्तात्रय गलांडे (महाराज) यांचे सुव्याश्र कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिरामध्ये 56 जणांनी रक्तदान केले.

जिल्हा परिषद आदर्श शाळा, चाकोरे येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनु वाघमोडे, किरण भांगे, रितेश ननवरे, अजय चोपडे, दत्ता साळुंके, दादा आरडे, राहुल जाधव, वैभव रसाळ, किरण नलवडे, अमित कस्तुरे, धुळदेव वाघमोडे, सागर साळुंखे, गणेश माने, प्रशांत कदम, राजेंद्र नलवडे यांसह मुख्याध्यापक बाळासो शिंदे, एकनाथ कदम सर आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन टायगर ग्रुपचे अध्यक्ष अतुल माने यांनी केले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामांच्या भेटीला आले अन् राजकीय एकनाथाला घेऊन गेले.
Next articleअलंकापुरीतून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here