लातूर (बारामती झटका)
विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एन सी ई आर टी नवी दील्ली यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मंथन या विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत लातूर येथील चि. सर्वेश प्रशांत राजे याने जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. विज्ञानाची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी, तसेच भारतीय वैज्ञानिकांच्या योगदानाची माहिती मिळावी यासाठी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते.
नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये लातूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता आठवी कक्षेत चिरंजीव सर्वेश शिकत आहे. सर्वेश राजे यांनी प्रथम श्रेणी मध्ये येऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यास रोख रकमेबरोबरच शिष्यवृत्तीही जाहिर झाली आहे. चिरंजीव सर्वेश हा माजी प्राचार्य डॉक्टर के.जी. राजे उर्फ काशिनाथ राजे यांचा नातू आहे. सर्वेशच्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng