विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भुताष्टे पंचक्रोशीतील सभासदांना घरपोच साखर वाटप

पंढरपूर (बारामती झटका)

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून दिपावली या सणासाठी सभासद , ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येते . यावर्षीही दि . १ सप्टेंबर पासून सवलतीच्या दराने साखर वाटप सुरु करण्यात आले असल्याची माहिती व्हा . चेअरमन वामनभाऊ ऊबाळे यांनी दिली . विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत दरवर्षी प्रती सभासद ५० किलो साखर सवलतीच्या दराने घरपोच वाटप करण्यात येते .

आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी भुताष्टे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना या ही वर्षी दिवाळी सणासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ५० किलो साखर सवलतीच्या दराने साखर वाटप करण्यात आली, साखरेच्या पोत्यांचे पूजन आणि वाटप करताना माजी सरपंच दिलीप यादव, सागर (भाऊ) यादव भास्कर यादव या समय करताना भुताष्टे गावचे माजी सरपंच दिलीप काका यादव सामाजिक कार्यकर्ते सागर यादव भास्कर यादव संभाजी पाटील बाळासाहेब व्यवहारे विजय यादव गणेश यादव बालाजी देवकुळे शिंदे साहेब आणि कारखान्याचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थितीत होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते नगरीमध्ये आरोग्य मंत्री ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे जंगी स्वागत.
Next articleभांबुर्डी ग्रामपंचायतच्या बिनविरोध उपसरपंच पदी आप्पासाहेब वाघमोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here