आ. बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वात रणजीतसिंह शिंदे यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील 14 गावातील साखर वाटपाचा उंबरे वेळापूर येथून शुभारंभ.
महाळुंग ( बारामती झटका )
माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालूक्यातील 14 गावाची दिपावळीनिमित्त सभासद घरपोच साखर वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात उंबरे वेळापूर गावात विठ्ठलरावजी शिंदे सहकारी साखर कारखाना मार्फत आ. बबनदादा यांच्या नेतृत्वाखाली रणजितसिंह उर्फ भैय्या यांच्या सहकार्याने साखर वाटप केली आहे. यावेळी उंबरे गावचे युवा नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नवनाथ पवार, रणजितसिंह शिंदे युवामंचाचे अध्यक्ष – सुनिल गायकवाड, शिवाजी थिटे, ज्ञानेश्वर थिटे, प्रताप भोसले, कारखाना स्टाफमधून विकास खटके, हरीदास गायकवाड, संतोष पवार, बाळासाहेब थिटे, बळीराम भोसले आदी मान्यवरांसहित सभासदांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती. यामुळे उंबरे गावातून सर्व सभासदांमधून आनंदाचे वातावरणात झाले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng