विधवा पुनर्विवाह कार्याबद्दल कवी फुलचंद नागटिळक यांचा तर उपेक्षित वंचित समाजाच्या वेदनांना शब्दरुप देत समाजासमोर आणल्याबद्दल पत्रकार दीपाली सोनकवडे सन्मानित

पुणे (बारामती झटका)

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन पुणे येथील वृंदावन फाऊंडेशनच्या वतीने जनाई – मुक्ताई समाज भूषण पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संचालिका रेखाताई प्रमोदजी महाजन यांच्याहस्ते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ११ कर्तुत्ववान महिला भगिनींचा जनाई – मुक्ताई समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुणे येथील स्वातंत्रवीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ‌. गौतमी पवार तर, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सोमनाथ लांडगे, सामाजिक कार्यकर्ते विनायक राऊत, वृंदावन समुहाचे सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी विशेष बाब म्हणून विधवा आणि परितक्त्या महिलांचा पुनर्विवाह करण्यासाठी पुढाकार घेऊन पुनर्विवाह लावून देत असलेले माढा, जि. सोलापूर येथील कवी फुलचंद नागटिळक यांचा ते करत असलेल्या कार्याचा गौरव श्रीमती रेखाताई महाजन यांच्याहस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी फुलचंद नागटिळक करत असलेल्या कार्याचे कौतुक रेखाताई महाजन यांनी शाबासकी देत पाठ थोपटली. यासोबत उपेक्षित वंचित वडार समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, समस्या आणि प्रगती यावर प्रकाश टाकुन संशोधन करत असलेल्या युवा पत्रकार दीपाली सोनकवडे यांचा देखील सन्मान श्रीमती रेखाताई महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. याबद्दल दोन्ही पुरस्कार प्राप्त व्यक्तीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleयूरियाला पर्याय म्हणून अमोनियम सल्फेटचा वापर करा – सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी
Next articleकांद्याला कवडीमोल भाव आजची परिस्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here