विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांना स्वाभिमानी प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांचे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी यासाठी पत्र

नाशिक (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांना शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी यासाठी पत्र दिले आहे.

सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य सर्व मतदार शेतकरी आहेत. त्यांना मते दिल्यामुळेच तुम्ही आमदार म्हणून निवडून आला आहात. व पुढे विधानसभा अध्यक्षही झाला आहात. २२ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील शेतकरी शेतीला दिवसा वीज मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वात आंदोलन करत आहेत. दुर्दैवाने महावितरण आणि महाराष्ट्र सरकारने या आंदोलनाला फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वच राजकीय पक्षांबद्दल प्रचंड नाराजी व चीड निर्माण झाली आहे. आपणही आपली भूमिका स्पष्ट करून या मागणीच्या बाजूने ठामपणे उभे रहावे व ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात अध्यक्ष म्हणून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडावे. तसे न झाल्यास आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग न घेतल्यास मतदारसंघातील तुमच्या सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही अडथळे आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्र बारव संवर्धन मोहीमेच्या वतीने भवानी घाटातील बारवची स्वच्छता…
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचा वर्धापन दिन आरोग्य शिबिराने साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here