राजकीय रणांगणातील अभ्यासू व दूरदृष्टीचे विचारवंत व्यक्तिमत्व आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तीर्थयात्रेची सुरुवात.
अकलूज ( बारामती झटका )
विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पाच मे वाढदिवसानिमित्त सवतगव्हाण गावचे युवा नेते पै. यशराज नितीनराजे निंबाळकर यांनी शिवरत्न बंगला ते पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर असे यात्रेचे आयोजन केलेले होते. तीर्थयात्रेच्या वाहनाचे पूजन सौ. सत्यप्रभादेवी रणजीतसिंह मोहिते-पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्या कुमारी स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन नितीनराजे निंबाळकर, श्री. लक्ष्मण लवटे, श्री. पैलवान विराजभैया निंबाळकर, श्री. अविनाश जाधव, श्री. पैलवान यशभैय्या निंबाळकर, श्री. अरुण शिंदे, श्री. रामभाऊ जगताप, श्री. दिनकर गवळी, श्री. भिमराव आदमिले, श्री. धनुकाका राजूरकर, श्री. हनुमंत शिंदे, श्री. बाबुराव सावंत, श्री. बळीराम कुंभार, श्री. पांडुरंग कदम, श्री. दीपक निंबाळकर, श्री. सदाशिव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पै. यशराज निंबाळकर यांच्या तीर्थयात्रेच्या स्तुत्य उपक्रमाचे सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांनी कौतुक करून यात्रेकरूंना प्रवास सुखाचा होण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

राजकीय रणांगणातील अभ्यासू व दूरदृष्टीचे विचारवंत व्यक्तिमत्व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उपस्थित सर्व मान्यवर व यात्रेकरू यांनी शुभेच्छा देऊन तीर्थयात्रेच्या प्रवासासाठी रवाना झालेले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
