दूध गंगा दूध संस्थेचे चेअरमन तानाजीराव मुंगूसकर यांना पितृशोक.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक हरिभाऊ शंकरराव मुंगूसकर यांचे वार्धक्याने दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या परिवाराचे सांत्वन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले. स्वर्गीय हरिभाऊ मुंगूसकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परिवारातील सदस्यांशी हितगुज साधले.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव पाटील, माळशिरस तालुका भाजपचे उपाध्यक्ष महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, युवानेते ओंकार माने देशमुख, ग्रामपंचायतचे सदस्य सुनील मुंगूसकर व मुंगूसकर परिवारातील सदस्य उपस्थित होते. स्वर्गीय हरिभाऊ मुंगूसकर वेळापूर येथील दूध गंगा दूध संस्थेचे चेअरमन तानाजीराव मुंगूसकर यांचे ते वडील होते. मुंगूसकर परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांत्वनपर भेट मुंगूसकर परिवारांची घेतलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng