विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम.

मोटेवाडी (माळशिरस ) येथे विविध विकास कामांचे धुमधडाक्यात भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम.

माळशिरस ( बारामती झटका )

विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते मोठेवाडी माळशिरस येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम रविवार दिनांक 27/02/2022 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हा सह प्रभारी के के पाटील, जिल्हा परिषद सदस्य संगीताताई मोठे माळशिरस पंचायत समितीच्या सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे सिनेट सदस्य प्राध्यापक देविदास वायदंडे, भाजपा सोलापूर जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपा माळशिरस तालुका सरचिटणीस संजय देशमुख, सरपंच मोठेवाडी सौ द्वारका खरात, उपसरपंच कलावती ठेंगल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


मोटेवाडी माळशिरस येथे विविध विकास कामांचे धुमधडाक्यात भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे त्यामध्ये मोटे, रुपनवर वस्ती डांबरीकरण करणे 14 लाख, गणपत खरात वस्ती ते हरि दडस वस्ती खडीकरण करणे 6 लाख. श्रीनाथ मंदिर सभा मंडप बांधणे 7 लाख. श्रीनाथ मंदिर भक्त निवास खोली बांधणे 2.5 लाख. श श्रीनाथ मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे 3 लाख. जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व पेविंग ब्लॉक बसवणे 5 लाख.जिल्हा परिषद शाळा गावठाण व पालवे वस्ती वॉल कंपाऊंड बांधणे 8 लाख.आरोग्य केंद्र मारुती मंदिर रस्ता 3 लाख. जिल्हा परिषद शाळा पालवे वस्ती दुरुस्ती व पेविंग ब्लॉक बसवणे 3 लाख. जिल्हा परिषद शाळा माने वस्ती दुरुस्ती करणे4.80 लाख. अहिल्यादेवी पुतळा हायमास्ट दिवा बसवणे यमगर वस्ती हायमास्ट दिवा बसवणे नागोबा मंदिर म्हसवड रोड हायमास्ट दिवा बसवणे श्रीनाथ मंदिर व सिदवस्ती रस्ता करणे 10 लाख अशा विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष प्राध्यापक दादासाहेब खरात यांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम.
Next articleवेळापूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची नियुक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here